shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवरात्र उत्सवानिमित्त हिंगणेवाडीत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन*

*नवरात्र  उत्सवानिमित्त हिंगणेवाडीत होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन*
इंदापूर प्रतिनिधि:नवरात्र उत्सवानिमित्त शिवछत्रपती मित्र मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या होम मिनिस्टर-खेळ पैठणीचा या कार्यक्रमांमध्ये यावर्षीच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या स्वाती संदेश पवार तर उपविजेत्या राणी अमर कदम.स्वाती पवार यांना मानाची पैठणी प्रदान करण्यात आली तर उपविजेत्या राणी कदम यांना मिक्सर भेट देण्यात आला.उत्कंठा वाढवणार्या फेर्या पार करत स्वाती पवार यांनी अंतिम फेरीत कमी वेळात कागदी मनोरा रचत बाजी मारली.या स्पर्धेत ७५ महिलांनी सहभाग नोंदविला.होममिनिस्टर कार्यक्रमाचे हे मंडळाचे चौथे वर्ष असून महिलांसाठी संगीत खुर्ची,फनी गेम्स, रांगोळी स्पर्धा,भोंडला असे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.तुषार दुबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.प्रशांत स्टिल अँड फर्णीचर. यांच्यावतीने पैठणी व मिक्सर भेट देण्यात आला. अशी माहिती श्री निवास कदम यांनी दिली.
close