बेलापूर प्रतिनिधी:
अजिंक्य इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सतत वेगवेगळे उपक्रम राबविले जात असुन नवनविन तंत्रज्ञानाची माहीती विद्यार्थ्यांना दिल्यामुळेच या शाळेच्या विद्यार्थ्यांची एमबीबीएस साठी निवड झाली असल्याचे मत डॉक्टर प्रमोद कवडे यांनी व्यक्त केले.
अजिंक्य इंग्लीश मिडीयम स्कूलचे माजी विद्यार्थी आदित्य कवडे व कुलदीप काळे यांची लातुर व सांगली येथे एमबीबीएस साठी निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी डॉक्टर प्रमोद कवडे बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भेर्डापूरचे माजी उपसरपंच विजय काळे उपस्थित होते, याप्रसंगी विद्यालयामध्ये वादविवाद स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते,यावेळी विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य अभिजीत खरात व सर्व शिक्षकवृंद मेहनत घेऊन मुलं घडवण्याची कार्य करत आहेत, विद्यालयामध्ये विविध स्पर्धा घेतल्यामुळे तालुक्यात व जिल्ह्यामध्ये अजिंक्य चे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये चमकत आहेत, गणित व सायन्स या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडल्यास त्या विद्यार्थ्यांस अकरा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा विजय काळे यांनी केली. याप्रसंगी पं.स. उपसभापती बाळासाहेब तोरणे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर वैरागर, डॉक्टर गर्जे, मोहन येसेकर,योगेश काळे, भाऊसाहेब कांदळकर, बबन कदम तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
जयश्री बनकर यांनी प्रास्ताविक केले ,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीनियर शिक्षिका समीरा शेख यांनी केले तर आभार नितीन औताडे यांनी मानले.
*सहयोगी:
पत्रकार देवीदास देसाई -बेलापूर
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111