shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर येथे साखळी उपोषणात दिव्यांग बांधव गणेश धनवडे यांनी एक दिवसीय मौन उपोषण केले.

निमसाखर  येथे साखळी उपोषणात  दिव्यांग बांधव गणेश  धनवडे यांनी एक दिवसीय मौन उपोषण केले.
इंदापूर प्रतिनिधि: निमसाखर (ता. इंदापूर) येथे साखळी उपोषण सुरू आहे. येथील दिव्यांग मुलगा गणेश पंढरीनाथ धनवडे हा साखळी उपोषणात  सहभागी झालेला आहे.त्याने एक दिवसाचे मौन उपोषण आज निमसाखर येथील सर्व सकल मराठा बांधवां समवेत सुरू केले आहे. पंचक्रोशीतील सर्व मराठा बांधवांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवून सहभाग घेतलेला आहे.उपोषन दिनांक २६/१०/२०२३ पासून निमसाखर येथे सुरू आहे. निमसाखर व निमसाखर पंचक्रोशीतील सर्व जातीय बांधवांचा या उपोषणास मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे.
close