राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक शहरच्या सरचिटणीस पदी अनिस शेख यांची नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय नेते खा. शरद पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेश अध्यक्ष महबूब शेख, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर यांच्या वतीने करण्यात आली. असून निवडीचे पत्र देताना राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, जुनेद बागवान, सैफ बागवान, इकराम बागवान, फरहान सय्यद, सोनू सय्यद, जाहिर सय्यद, हाशिम सय्यद, ईमरान सय्यद, राशिद कुरेशी, अदनान कुरेशी, ज़ैद खान, शानूर शेख, आबिद शेख, मतीन भाई आदी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष अभिषेक कळमकर म्हणाले की, अनिस शेख यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. शहरांमध्ये सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे सामाजिक कार्य सुरू असून अन्याय विरोधात आवाज उठून समाजाला न्याय मिळवून देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. तर बेरोजगार युवकांना रोजगार देण्याचे काम त्यांनी केले असून समाजातील युवकांना सातत्याने योग्य पद्धतीने दिशा देण्याचे कार्य ते करत असल्याचे सांगितले व युवक अध्यक्ष प्रकाश पोटे म्हणाले की, अनिस शेख याचा युवकांमध्ये दांडगा जनसंपर्क असल्याने व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल पक्षाशी युवक हा मोठ्या प्रमाणात जोडला जाणार असल्याची भावना व्यक्त केली. तर सत्काराला उत्तर देत अनिस शेख म्हणाले की, पक्षाने दिलेल्या पक्षाचे ध्येय धोरण जबाबदारी निश्चित पाळणार असून लवकरच राष्ट्रवादी युवक चे नोकरी मिळावा घेणार असून युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असून विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची भावना व्यक्त केली...

