बी.आर.चेडे - शिरसगांव
इपीएस ९५ पेन्शनधारकांच्या पेन्शनवाढीचा अद्याप निर्णय न झाल्याने दि १२ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे देशातील महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटना श्रीरामपूर यांच्या वतीने देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय आज रोजी श्रीरामपूर येथे टिळक वाचनालय येथे झालेल्या पेन्शनर्स संघटना बैठकीत घेण्यात आला.
म.राज्य पेन्शनर्स संघटना गेली १२ वर्षे लढा देत आहे तरी पेन्शनवाढ करण्यात आली नाही. २०१२ या वर्षी खा.भगतसिंह कोशियारी यांचे अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने रु ३०००/- पेन्शनवाढ करावी अशी शिफारस केली परंतु केंद्र सरकारने २०१४ या वर्षी रु १०००/- मंजूर करण्यात आले.ही पेन्शन अत्यल्प असून दैनंदिन गरजा भागविता येत नाही.दि २० एप्रिल २३ रोजी व २९ ओगस्ट रोजी लोकसभा सेक्रेटेरीएटपार्लमेंट हाउस दिल्ली अडीशनल डायरेक्टर यांनी पेन्शनधारकांच्या मागणीसाठी पेन्शन संघटना व ट्रेड युनियन संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.त्याची माहिती आज दिली.रु ३०००/- ची शिफारस आज अमलात आणली असती तर आज पेन्शन ८ ते ९०००/-रु पेन्शन दरमहा मिळाली असती.त्यासाठी १२ वर्षे आंदोलने केली पण पदरात आही आले नाही.पंतप्रधान यांनी अनेक घोषणा केल्या व शेतकरी, कामगार,आदींना भरघोष अनुदान देण्याच्या घोषणा केल्या पण लाखो रु जमा करणाऱ्या पेन्शनधारकांना दरमहा ८०० ते १५०० पर्यंत पेन्शन दिली जाते हा अन्याय असल्याचे मनोगत या बैठकीत संघटना अध्यक्ष एस एल दहिफळे,सरचिटणीस सुभाष कुलकर्णी,त्रिंबक घुगरकर, उपाध्यक्ष बाबुराव दळवी, उपाध्यक्ष[ अ.नगर] अंकुश पवार [राहुरी] चिटणीस भागीनाथ काळे [शेवगाव] आदींनी केले.
नोव्हेंबर अखेर पेन्शनवाढीचा निर्णय न झाल्यास येत्या १२ डिसेंबर रोजी नवी दिल्ली जंतर मंतर येथे देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे तसे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी,खा.सुजय विखे पा.यांना देण्यात आले आहे. देशातील पेन्शनधारकांनी रेल्वेची तिकिटे अगोदरच काढून घ्यावी. महाराष्ट्रातून ५०००० व देशातून २ लाख कर्मचारी दिल्लीत आंदोलनात सहभागी होतील असा विश्वास उपाध्यक्ष बाबुराव दळवी,व अंकुश पवार यांनी व्यक्त केला.
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी:स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

