shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरोग्य धनसंपदा...गर्भधारणेची पूर्वतयारी..डॉ.प्रणाली सायंकार-हिंगणघाट

हिंगणघाट:-
बाळावर चांगले संस्कार करण्याची सुरुवात ही गर्भापासूनच होते. प्रत्येक आई-वडिलांचेच आपल्या मुलाचा चांगला सांभाळ करण्यासोबतच चांगले संस्कार करण्याचे स्वप्न असते.घरात लहान बाळ येणार असलं की त्याची तयारी घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने करु लागतो. मग त्या नव्या पाहुण्याचे स्वागत कसे करायचे? त्याला कम्फर्टेबल वाटेल अशी घरातील जागा कोणती? त्याचं नाव काय ठेवायचं? त्याच्यासाठी शॉपिंग काय करायची? याविषयी घरातील सर्वजण उत्सुक असतात. तर आई-वडिलांचा आनंद तर या काळात गगनी मावत नसतो. बाळ येणार हा आनंद एका बाजूला आणि येणा-या बाळाला एक चांगली व्यक्ती म्हणून घडवण्याच्या जबाबदारीचा ताण एका बाजूला अशा द्विधा मनस्थितीतून पालक जात असतात.जसं बाळाचं शरीर निरोगी व सुदृढ राहवं म्हणून ते प्रयत्न करतात अगदी तसंच ते बाळावर गर्भातच संस्कार करण्यासाठीही प्रयत्न करतात. 


भारतीय संस्कृतीत अनेक चालीरितींचे पालन केले जाते त्यापैकीच गर्भसंस्कार ही देखील एक महत्त्वाची पद्धत आहे. गर्भसंस्कार यामध्ये गर्भ म्हणजे बाळ व संस्कार म्हणजे त्या बालावरील संस्कार असा त्याचा अर्थ आहे. गर्भावस्थे दरम्यान बाळाला चांगल्या गोष्टी शिकवणे व सकारात्मक विचार व नैतिक मुल्य गर्भावर रुजवणे म्हणजेच गर्भसंस्कार होय! 
प्रत्येक महिलेसाठी आपण आई होणार आहोत हे कळणे हा अत्यंत खास क्षण असतो. महिन्याला येणारी पाळी अर्थात मासिक पाळी चुकली की मनात शंकेची पाल चुकचुकते आणि मग आपण प्रेग्नंट अर्थात गरोदर तर नाही ना? हाच मनात पहिला विचार येतो. गर्भधारण नंतर निरोगी बाळाच्या जन्मासाठी, गर्भवती महिलेने तिच्या आरोग्याकडे देखील विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी गरोदरपणात स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. चांगले अन्न गर्भवती स्त्रीला तंदुरुस्त आणि निरोगी बनवते, तसेच अन्नाचा थेट परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. त्याचबरोबर सकस व पौष्टिक अन्नामुळे प्रसूतीदरम्यान होणाऱ्या समस्याही टाळता येतात. गर्भधारणेदरम्यान स्त्री जे काही खाते त्याचा परिणाम पोटातील बाळावर होत असतो. मुलांचा मेंदू तीक्ष्ण असतो, त्याला संपूर्ण पोषण मिळाले तर प्रसूतीनंतर सुदृढ बालकाचा जन्म होतो. 

*या विषयावर हिंगणघाटच्या सुप्रसिद्ध डॉक्टर प्रणाली सायंकार यांनी आपले काही मत व्यक्त केले आहेत,ते कोणते हे आपण जाणून घेऊयात*

त्या दिवशी ओ पी डी मध्ये पाहिलीच पेशंट दीड महिन्याची गर्भवती फक्त २२ वर्षाची होती  तिचे शुगर लेवल प्रचंड वाढून होते
            इतके जास्त शुगरचे प्रमाण होणाऱ्या बाळासाठी घातक असल्यामुळे  नाईलाजाने  आम्हाला गर्भपाताच्या निर्णय घ्यावा लागला गेल्या काही वर्षापासून गर्भ अवस्था व डिलिव्हरी प्रसूती संबंधित प्रॉब्लेम्स खूप वाढले  आहेत 
सिझेरियनचे प्रमाण वाढत आहे बदललेली जीवनशैली प्रदूषण इत्यादी कारणामुळे प्रत्येक वयातील शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे अगदी कमी वयातही डायबिटीस मधुमेह लठ्ठपणा अश्या समस्या खूप जास्ती प्रमाणात दिसून येत आहे या सगळ्यांच्या परिणाम  होणाऱ्या बाळावर निश्चितच होतो म्हणूनच आज-काल प्रेग्नेंसी आणि डिलिव्हरी किती कठीण होत चालले आहे ओरड न करता त्याचे मुळे कारण काय आहे हे जाणून घेणे आणि त्यासंबंधी उपाययोजना करणे हे जास्ती आवश्यक आहे,प्रीकन्सेपशनल कौन्सिलिंग किंवा गर्भधारणापूर्वीची तयारी म्हणजेच गर्भधारणा करण्यापूर्वीच स्त्री आणि पुरुष या दोघांनीही आपण त्यासाठी योग्य प्रकारे तयार आहोत का याची चाचणी करून घेणे यासाठी खालील काही मुद्दे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.

गर्भधारणेचे वय

खूप कमी वय आणि खूप जास्ती वय या दोन्हीही स्थितीत
प्रेग्नेंसी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होण्याची रिस्क धोका जास्ती असतो आजकाल शिक्षण करियर या सर्वामुळे मुलीच्या लग्नाचे वय पर्यायने गर्भधारणा चे वय वाढत आहे,
यामुळे बाळामध्ये शारीरिक व्यंग आणि स्त्रियांना बीपी शुगर असे  प्रॉब्लेम येण्याची शक्यता जास्त असते साधारणता २२ ते ३०,३२ वयापर्यंत दोन्ही प्रेग्नेंसी आटोपलेल्या बऱ्या.

*वजन

खूप जास्ती लठ्ठपणा आणि खूप कमी वजन या दोन्ही  गोष्टी प्रेग्नेंसी साठी घातक आहेत, लठ्ठ मुलींच्या पोटी जन्मलेल्या बाळांना न्यूरल ट्यूब डेफिट्स हार्ट डेफिट्स आणि आईला बीपी शुगर असे प्रॉब्लेम्स येण्याची शक्यता जास्ती असते कमी वजनाच्या आईच्या बाळाचे वजन कमी असते वेळे आधी प्रसूती (प्रीमॅच्युर बर्थ) अशा गोष्टीची रिस्क धोका असतो.

मासिक पाळीचे  पॅटर्न

जंक फूड लठ्ठपणा  फिजिकल एक्सरसाइज च्या अभाव  यामुळे हार्मोन्स ईमबॅलन्स व पर्यायांनी मासिक पाळी संबंधित प्रॉब्लेम्स मुलींचे खूप वाढलेले आहे, गर्भधारण पूर्वी मासिक पाळी नियमित येणे व मासिक पाळीच्या स्त्राव योग्य प्रमाणात असणे आवश्यक आहे.

आहार

होणाऱ्या आईच्या शरीरामध्ये विटामिन कॅल्शियम मायक्रो न्यूट्रियन्स  लोह इत्यादींची कमी असल्यास होणाऱ्या बाळावर त्याच्या निश्चितच परिणाम होतो, प्रेग्नेंसी प्लान करण्यापूर्वी कमीत कमी एक ते दोन महिन्यापूर्वी पासून फॉलिक ऍसिड रिप्लिमेंटीशन घेणे आवश्यक आहे.

फॉलिक ऍसिड

 सेप्लीमेंटेंशन,ओबेसथेटिक हिस्ट्री/पर्सनल अँड फॅमिली हिस्ट्री

कधीही पहिल्या प्रेग्नेंसी मध्ये काही कॉम्प्लिकेशन झाल्यास गर्भपात झाल्यास पुढील प्रेग्नेंसी ठेवण्यापूर्वी डॉक्टरच्या सल्ला घेणे जरुरी आहे मुलींना अस्थमा डायबिटीस झटक्यांची बिमारी अशा कुठल्याही प्रकारच्या आजार असेल आणि त्याचे काही औषधी चालू असल्यास प्रेग्नेंसी प्लान करण्यापूर्वी डॉक्टर ना जरूर भेटा तुमच्या कुटुंबामध्ये कोणालाही मतिमंद पणा किंवा शारीरिक व्यंग असलेले बाळ असेल तुमच्या आई-बाबांना ब्लडप्रेशर मधुमेह अशा प्रकारचे आजार असतील तर अशा परिस्थितीत गर्भधारणापूर्वी डॉक्टरची सल्ला घ्या युरीन इन्फेक्शन पांढऱ्या  पाण्याचे इन्फेक्शन असल्याच त्याची  अगोदरच आणि समुळ उपचार करणे जरुरी आहे.

*रक्त चाचण्या

गर्भधारणे पूर्वी स्त्री आणि पुरुष यांच्या हेमोग्लोबिन,सीबीसी, रक्तगट, रक्तातील साखरेचे प्रमाण, थायराइड प्रोफाइल, सिकलसेल/थेलेसेमिया, अशा सर्व प्रकारच्या चाचण्या करून घेणे आवश्यक आहे,
             शक्य असल्यास रूबेला हिपर्टायटिस- बी यांचे लसीकरण करून घेतल्यास फारच उत्तम.

*देखो इन्हें यह है औस की बूंदे

*पत्तों की गोद में आसमान से कुंदे

*अंगड़ाई ले फिर करवट बदलकर

*नाजुक से मोती हंस दे फिसल कर

*खो ना जाए यह तारे जमी  पर

येणारे नवीन बाळ आयुष्यभर शारीरिक व मानसिक दृष्ट्याने स्वस्थ रहावे ही प्रत्येकांची जबाबदारी आहे या दिशेने आपण पाऊले उचलल्यास फक्त स्वच्छ भारताचे नवे तर सुदृढ आणि  सुसंस्कारीत भारत ही संकल्पना प्रत्यक्ष आकारात येण्यास निश्चितच मदत होणार आहे.


डॉक्टर प्रणाली सायंकार
(स्त्रीरोग तज्ञ)
अध्यक्षा : इंडियन मेडिकल असोसिएशन 
(आय.एम.ए.) हिंगणघाट जि.वर्धा

-------------------------------------------
*पत्रकार इस्त्याकभाई शेख*
( *सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ) हिंगणघाट जि.वर्धा 

*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close