shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी श्रेया युवराज काळे हिची निवड

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी श्रेया युवराज काळे हिची निवड 
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित माध्यमिक विद्यालय, तावशी ता. इंदापूर विद्यालयातील 
 विद्यार्थिनी श्रेया युवराज काळे हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक मारुती वणवे यांनी दिली.विभागीय जुदो  कुस्ती मध्ये श्रेया काळे हिने  ४० किलो वजनी गटात नेवासा जि- अहमदनगर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत यश संपादन केले. विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने श्रेया काळे हिची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी  निवड झाली.महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे व राष्ट्रवादी बारामती शहर अध्यक्ष जय  पाटील यांच्या हस्ते बारामती येथे श्रेया काळे हिचा सन्मान करण्यात आला. राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी श्रेया काळे हिची निवड झाल्याबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम,सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त शिवाजीराव रणवरे ,वीरबाला पाटील ,कुलदीप हेगडे,शंकरराव रणसिंग, राही रणसिंग यांनी अभिनंदन केले.श्रेया काळे हिला मार्गदर्शक सागर लाड व क्रीडा शिक्षक झुंबर पवार यांचे मार्गदर्शन लाभले.


close