shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रणसिंग महाविद्यालयातील खेळाडूंचे यश

रणसिंग  महाविद्यालयातील खेळाडूंचे यश

फोटो ओळ -  रणसिंग महाविद्यालातील यशस्वी खेळाडू

इंदापूर प्रतिनिधि: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती कुस्ती मुले स्पर्धा  मु.सा. काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर ता. बारामती  येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंब येथील खेळाडूंनी दोन सुवर्ण पदके मिळवली. ग्रेकोरोमन प्रकारामध्ये  सुदेश सुनील बागल याने ७२ किलो वजनीगटामध्ये तसेच महेश खोमणे याने फ्री स्टाईल ८६ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक संपादित केले. पुणे येथे मैदानी स्पर्धे मध्ये अभिषेक चव्हाण याने भाला फेक या क्रीडा प्रकारात रजत पदक संपादित केले.या सर्व खेळाडूंची आंतर विभागीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
 इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान चे संस्था अध्यक्ष आनंदी रणसिंग,उपाध्यक्ष प्रकाश कदम ,सचिव वीरसिंह रणसिंग,विश्वस्त शिवाजीराव रणवरे ,वीरबाला पाटील ,कुलदीप हेगडे,शंकरराव रणसिंग, राही रणसिंग यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट व खेळाडूंचे अभिनंदन केले. संस्था  सचिव विरसिंह रणसिंग यांनी महाविद्यालय  खेळाडूंना आवश्यक सुविधा सहकार्य व मदत महाविद्यालय व संस्थेमार्फत उपलब्ध होत असल्यामुळे विद्यार्थी प्रगती करीत असल्याचे सांगितले.यशस्वी खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. सुहास भैरट यांचे मार्गदर्शन लाभले


close