शेतकरी हिताची बातमी
(शिर्डी : प्रतिनिधी संजय महाजन)
धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सन 2022-23 या वर्षातील 1 हजार कोटीच्या आतील ठेवी असलेल्या बँकांमध्ये सर्वांगीण उत्कृष्ट कामकाजाबाबत “फ्रंटीयर्स को-ऑपरेटिव्ह बँकींग असोसिएशन (FCBA), दिल्ली” मार्फत जिल्हा बँकेस “बँकेची सर्वांगीण प्रगती” व “क्लाऊड टेक्नॉलॉजी (तांत्रिक प्रगती)” असे दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले ..
त्यानिमित्त “महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन एपेक्स कॉन्सिल” चे सदस्य, “धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार”, खेळ व खेळाडूचे आश्रयदाते, धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्रीयुत बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे यांचा अभिनंदन व सत्कार करतांना धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री. लहू पाटील व कार्यकारणीतील सदस्य सर्वश्री विक्रम राठोड, राजन चौक, मोहन तरटे, अरविंद किल्लेदार, नरेंद्र काळमेख, प्रा. सतीष मराठे, दिलीप उपाध्ये, दबीर शेख, महेंद्र शर्मा, अभिषेक पाटील, स्वप्नील निकुंभ, हेमंत पाटील, दिलीप आप्पा शितोळे व सचिन आखाडे उपस्थित होते.

