श्रीरामपूर प्रतिनिधी:
माजी केंद्रीय मंञी स्व.बबनराव ढाकणे हे सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढणारे झुंजार नेते होते.त्यांचे निधनाने एक संघर्षशील व लढवैय्या नेता हरपला अशा शब्दांत माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी आपल्या भावना व्यक्त केला.
स्व.ढाकणे यांचे निधनाबद्दल प्रतिक्रिया देताना श्री.मुरकुटे म्हणाले की, स्व.ढाकणे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. गावापासून ते राज्याचे मंञीपद, विधानसभा उपाध्यक्ष, जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष ते केन्द्रीय मंञीपद अशी विविध पदे त्यांनी स्वकर्तृत्वावर मिळविली. मूळातच त्यांचे व्यक्तिमत्व निर्भिड होते तर पिंड सामान्यांच्या चळवळीचा व झगडण्याचा होता. माजी पंतप्रधान नेहरुंची भेट असो वा विधानसभेत कागदे भिरकावून प्रेक्षक गॕलरीतून उडी मारणे असो यातून त्यांच्या निर्भिडतेची प्रचिती येते. त्यांचा आणि माझा सन १९८० पासून स्नेह होता. अशा या सर्वसामान्यांच्या असामान्य नेत्यास माझे व अशोक उद्योग समुहाचेवतीने भावपूर्ण श्रध्दांजली.
पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर
*सहयोगी:स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

