लोणी प्रतिनिधी:
लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे प्रा.प्रविण गायकर यांना भगवंत विद्यापीठ, अजमेर येथून व्यवस्थापन या विभागात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.प्रविण गायकर यांनी “ महाराष्ट्रातील डाळिंब विपणनाचा विश्लेषणात्मक अभ्यास” या विपणन व्यवस्थापन विषयावर शोधनिबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने सदर शोधनिबंध मान्य करत प्रा.प्रविण गायकर यांस पीएचडी पदवी प्रदान केली. व्यवस्थापन विभागातील डॉ. जतीन यादव यांचे त्यांना प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशेष योगदान लाभले. प्रा.प्रविण गायकर हे संगमनेर तालुक्यातील मौजे राजापूर येथील रहिवाशी आहे. प्रा.प्रविण गायकर यांनी आपल्या पदवीचे शिक्षण सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, संगमनेर येथे तर पदवीत्तर शिक्षण पुणे येथील डाटा सिस्टम रिसर्च फौंडेशन येथून एमसीएम आणि ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ मँनेजमेंट, संगमनेर येथून एमबीए चे शिक्षण पूर्ण केलेले आहे. कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे शैक्षणिक कार्यक्रमांसोबतच राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत राबविलेल्या समाजपयोगी उपक्रमांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रा. गायकर यांना महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय कार्यक्रम अधिकारी प्रशंसा पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे.
प्रा.गायकर यांनी त्यांच्या यशासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा, सर्व शिक्षक आणि मार्गदर्शक, कुटुंबातील सर्व सदस्य, तसेच मित्र परिवार यांचा मोलाचा वाटा असल्याचे आणि पीएचडी प्राप्त झाल्याने कार्याविषयी असणारी जबाबदारी अधिक वाढली आहे अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
प्रा.प्रविण गायकर यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्ह परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री.भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य डॉ.विशाल केदारी, डॉ.अनिल बेंद्रे तसेच इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.
*पत्रकार बी.आर.चेडे- शिरसगांव
*सहयोगी: स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

