shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अपघात होऊ नयेत म्हणून साखर कारखाने चालू होण्यापूर्वीच ट्रॅक्टर ट्रॉली यांना रिफ्लेक्टर बसवून घ्यावेत- भरत शहा.

अपघात होऊ नयेत म्हणून साखर कारखाने चालू  होण्यापूर्वीच ट्रॅक्टर ट्रॉली यांना रिफ्लेक्टर बसवून घ्यावेत- भरत शहा.  

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती आयोजीत इंदापूर तालुका शिबिर कामकाजाचा शुभारंभ.

प्रत्येक मंगळवारी आयटीआय पालखी तळ येथे होणार शिबिर कार्यालयातून कामकाज.
इंदापूर प्रतिनिधि: इंदापूर आय.टी.आय. पालखी तळ येथे शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती आयोजीत इंदापूर तालुका शिबिर कामकाजाचा शुभारंभ कर्मयोगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरतशेठ शहा, इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, बारामती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर,विनय इंडस्ट्रीजचे केशव बोराटे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, माजी उपसरपंच भागवत काटकर,  मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळुंखे, सुरज पाटील, हर्षदा खारतोडे ,विठ्ठल गावडे, मोहन तनपुरे, ऋषी वाघमारे,ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तय्यब शेख, मोहिनी दळवी, विष्णू बागल इत्यादी मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला. यावेळी शिबिरातील लाभार्थी व आयटीआय कॉलेजचे उपप्राचार्य एस एस झणझणे व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी भरतशेठ शहा म्हणाले की, इंदापूर येथील शिबीर कार्यालयात जे काही सुविधांची आवश्यकता आहे. त्याबाबत सर्व काही उपलब्ध करून देऊ. सध्या साखर कारखाने चालू होत असून कारखाना चालू होण्यापूर्वीच ट्रॅक्टर ट्रॉली यांना रिफ्लेक्टर बसवून घ्यावेत. जेणेकरून अपघात होऊ नयेत. याबाबत काळजी करणे गरजेचे आहेत. त्या संदर्भात उपप्रादेशिक कार्यालयाकडून सूचना देणे गरजेचे आहे. युवकांनी लक्षात घ्यावी की प्रादेशिक कार्यालयाकडून दंड झाला तर होऊ द्या. परंतु नंतर दंड होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी कारण ते आपल्या हितासाठी आहे. उद्या एखादा प्रसंग घडला तर त्याचा पश्चाताप आपल्याला व आपल्या कुटुंबाला झाला नाही पाहिजे. याची काळजी घेतली पाहिजे .यासाठी आपण स्वतः नियम पाळले पाहिजेत अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की इंदापूर येथील प्रत्येक मंगळवारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती अंतर्गत होणाऱ्या शिबिराबरोबर प्रत्येक महिन्यातील शेवटच्या मंगळवारी महसूल कृषी व पंचायत समिती इंदापूर यांच्यावतीने सुद्धा लोकांना इतर सुविधा मिळण्याकरिता एकत्र शिबिराचे आयोजन या ठिकाणी करून इंदापूर तालुक्यातील नागरिकांना त्याचा लाभ मिळावा त्याबाबत महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी नियोजन करण्यात करण्यासंदर्भात आश्वासित केले.

तसेच यावेळी ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक तयुब शेख यांनी वाहनांचे शिकाव लायसन्स, मालवाहतूक वाहनांच्या पासिंगचे कामकाज सुरू करण्यासाठी मागणी करून त्यासाठी जो निधीची आवश्यकता लागेल त्यासाठी आमदार यांच्याकडे पाठपुरावा करून तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  
याप्रसंगी माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन सुरज पाटील यांनी केले तर आभार हर्षदा खारतोडे यांनी मानले.
------------------------
चौकट:  प्रत्येक मंगळवारी आयटीआय पालखीतळ येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी असतील त्यांना भेटून अडचणीचे निराकरण करावे - राजेंद्र केसकर.

 उपप्रादेशिक कार्यालय बारामती अंतर्गत इंदापूर तालुका शिबिर कार्यालय कामकाज शुभारंभ आज करण्यात आला असून कोविड नंतर हे शिबिर बंद होते . आमदार दत्तात्रय भरणे यांची मागणी नुसार शिबिर कार्यालय सुरू केलेले आहे. यामध्ये सर्व सेवा ऑनलाईन आहेत. तरी वाहन चाचणी, वाहन स्क्रॅप करणे. परवाना नूतनीकरण इत्यादी कामे या ठिकाणी केले जातील. मोटार निरीक्षक शहरातील व संस्थेच्या ठिकाणी जाऊन रस्ता सुरक्षा अंतर्गत मार्गदर्शन करतील. सर्व दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा .चार चाकी कार चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा. नशा पाणी करून वाहन चालू नये  याबाबत विविध आस्थापनात जाऊन मार्गदर्शन करणे. एखाद्या ठिकाणी अपघात झाला की वाहन तपासणी तात्काळ केली जाईल तसेच कॉलेजमध्ये जाऊन रस्ता सुरक्षा वर मार्गदर्शन केले जाईल. हा या मागचा उद्देश आहे. सर्व सेवा ऑनलाईन झाले आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी ऑनलाईन सर्विसचा वापर करून उपयोग करून बारामती येथे प्रत्येक सेवेसाठी येण्याची गरज नाही. पत्ता बदलणे. वाहन हस्तांतर करणे यासाठी जास्तीत जास्त ऑनलाइनचा वापर करावा .आपलं काम करून घ्यावे. काही अडचण असेल तर प्रत्येक मंगळवारी आयटीआय पालखीतळ येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी असतील त्यांना भेटून निराकरण करावे असे उपप्रादेशिक कार्यालय अधिकारी राजेंद्र केसकर यांनी यावेळी सांगितले.
close