*चंद्रकांत झुरंगे - भोकर
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील अक्षय चौधरी यांची दि महाराष्ट्र स्टेट असोसिएशन यांच्या अंतर्गत होणार्या राज्यस्तरीय नॅशनल टी-10 स्पर्धेत महाराष्ट्र दिव्यांग क्रीकेट असोसिएशन यांचेतर्फे कणधारपदी निवड झाली आहे तर याच संघात खेळाडू म्हणून भोकरचाच दिव्यांग खेळाडू मनेष शिंदे याचा राज्य संघात खेळाडू म्हणून समावेश झाला आहे. त्यांचे या निवडीचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
संगमनेर येथील पावन धरती भुमीवर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे आज दि.३१ आक्टोबर पासून दि.४ नोव्हेबर दरम्यान होत असलेल्या क्रीडास्पर्धा अंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट असोसिएशन फॉर असोसिएशन अंतर्गत राज्यस्तरीय टि - 10 स्पर्धां मध्ये महाराष्ट्र संघातर्फे भोकर येथील दिव्यांग क्रीकेटपटू अक्षय विश्वनाथ चौधरी याची कर्णधारपदी निवड झाली आहे तर याच संघात खेळाडू म्हणून भोकरचाच दिव्यांग खेळाडू मनेष अशोक शिंदे याचा या राज्य संघात खेळाडू म्हणून समावेश झाला आहे.
दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रीकेट स्पर्धासाठी महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, तामीळनाडू, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात, सौराष्ट्र, राजस्थान येथील दिव्यांग संघ सहभागी होत आहेत. या राज्यस्तरीय स्पर्धासाठी महाराष्ट्र दिव्यांग क्रीकेट संघाचे कर्णधापद येथील दिव्यांग खेळाडू अक्षय चौधरी हा भुषवित असल्याने व भोकरचा मनेष शिंदे यांची खेळाडू म्हणून निवड झाल्याने या स्पर्धाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलेले आहे तसेच अक्षय याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यास शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

