शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
आदिवासी विकास संघाच्या वतीने शनिवार दिनांक १४/१०/२०२३ रोजी सेवानिवृत्त* *कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली.या बैठकीमध्ये कार्यक्रम रविवार दिनांक २२/१०/२०२३ रोजी सकाळी वेळ १०.३० ते २ या वेळेत घेण्याचे एकमताने निश्चित एकमताने निश्चित करण्यात आले. न्याहाळोद गावात आत्तापर्यंत चतुर्थ कर्मचारी पासून ते वर्ग १ पर्यंतचे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ व पुरस्कार वितरण सोहळा थाटात संपन्न होणार आहे. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बैठकीला प्रा.मोतीलाल सोनवणे (पत्रकार) माजी आदर्श सरपंच कैलास पाटील, प्रा. संतोष कढरे, दिगंबर अमृतकर, सुरेश पाटील, भटू कढरे, केशव अमृतकर, सुनील माळी, नितीन जैन सर, शालिक शिरसाट, नंदलाल शिरसाट, धनराज सोनवणे, भीमराव सैंदाणे, संतोष सैंदाणे, रोहिदास चव्हाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

