शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
सामाजिक बातमी
ज्या साईंच्या नगरीत साईबाबा नी सबका मालिक एक या मंत्राचा सर्वांना संदेश दिला सर्व जाती धर्माचे लोक एकच आहे म्हणून सर्वांनी श्रद्धा व सबुरी या मंत्राचे आचरण करून सेवा करावी त्याच नगरीत शिर्डी नगर पालिका प्रशासन डाळिंब विक्रेते महिला मनुखे विक्रेते महिला पुरुष यांच्यावर अन्याय करतांना दिसून येत आहे एक हजार रूम च्या समोर बचत गटामार्फत वडापाव सेंटर हे नगर मनमाड रोडवरच आहे त्या मार्फत त्या ठिकाणी बचत गटाचा व्यवसाय जोरात चालु आहे मात्र त्याच रोडवर डाळिंब पेरू अन्य महिला पुरुष विक्रेत्यांना नगर पालिका वसुली पथक धाक दाखवून हैराण करत आहे तर बचत गटांना अधिकृत नगर पालिकेची परवानगी असल्याचे सांगून या डाळिंब विक्रेते पेरू विक्रेते यांच्यावर अन्याय करत आहे. तरी बचत गट वाल्याना तुपाशी व इतरांना उपाशी अशी भूमिका नगर पालिका प्रशासनानाने त्वरित बंद करावी अन्यथा सर्व फुटपाथ डाळिंब विक्रेते यांना बरोबर घेऊन नगर पालिका प्रशासनावर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल. असा इशारा भारतीय लहुजी सेनेचे समीर वीर यांनी या निवेदनातून दिला आहे. त्यांनी पुढे म्हंटले आहे की शिर्डीत साई भक्तांच्या गर्दीवरच आर्थिक उलाढाल होते. मात्र साई भक्तांची गर्दी सध्या कमी प्रमाणात असल्याने सगळेच व्यावसायिक हैराण झाले आहे.
त्यातला त्यात गरीब फळ विक्रेते पेरू विक्रेते व अन्य फूट पाथवर व्यवसाय करणाऱ्या लोकांना असा मानसिक त्रास देण्याचा धंदा त्वरित नगर पालिका प्रशासनाने बंद करावा. असेही समीर वीर यांनी म्हंटले आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही पाठविले असल्याचे समीर वीर यांनी म्हंटले आहे..दरम्यान वसुली पथकाची चार चाकी वाहन याच ठिकाणी थांबून राहिल्याने इतर व्यावसायिकांना मोठी अडचण ही निर्माण होत आहे.
नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांना याबाबत विनंती करणार :- रामभाऊ पिंगळे
दोन दिवसांपासून फूट पाथवर पोट भरणाऱ्या व्यावसायिकाना त्रास दिल्याने व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. तरी या व्यावसायिकांना न्याय देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील यांना विनंती करणार आहे.

