जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
मुंबईसह महाराष्ट्रातील विविध महानगरपालिकांच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकांनंतर जवळपास सर्वच न्यूज चॅनेल्स व वर्तमानपत्रांतून “भाजपाची मुसंडी”, “दणदणीत यश”, “२६ महापौर भाजप-युतीचे” अशा मथळ्यांचे वार्तांकन करण्यात आले.
मात्र या वार्तांकनामध्ये खरी परिस्थिती आणि मूलभूत प्रश्न जाणूनबुजून दुर्लक्षित केले जात आहेत का? असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे.
*खरंच हे यश* - भाजपाच्या नवीन कार्यकर्त्यांमुळे जनतेला केलेल्या स्थानिक विकासकामांमुळे की जवळपास प्रत्येक महानगरपालिकेत इतर पक्षांतील माजी आमदार, खासदार, नगरसेवक मोठ्या प्रमाणावर पक्षात घेऊन मिळवलेले आहे ?
याबाबत पत्रकारांनी सत्ताधाऱ्यांना थेट प्रश्न विचारलेले दिसत नाहीत.
*मुंबईचे वास्तव* - मुंबई महानगरपालिकेत भाजप याआधी ८३ जागांवर होता.
यावेळी उद्धव ठाकरे गट, काँग्रेस इतर पक्षांतील माजी नगरसेवक तसेच शिंदे गटाची मदत
हे सर्व असूनही भाजप फक्त ८९ जागांपर्यंत पोहोचला, म्हणजेच केवळ ६–७ जागांची वाढ झाली. तरीदेखील हे निकाल “जनतेचा प्रचंड कौल” म्हणून मांडले जात आहेत.
*मग प्रश्न असा आहे की* - किती नवीन भाजप कार्यकर्ते नगरसेवक झाले ?
किती इतर पक्षातून आलेले उमेदवार निवडून आले ?
सरकारी यंत्रणांचा दबाव, चौकशीची भीती, सत्तेचा गैरवापर — यावर चर्चा का होत नाही ?
*पत्रकारितेची जबाबदारी" - लोकशाहीत पत्रकारिता ही चौथा स्तंभ आहे.
सत्तेची बाजू मांडणे नव्हे, तर सत्तेला प्रश्न विचारणे हे तिचे कर्तव्य आहे.
आज जर हे प्रश्न विचारले जात नसतील,
तर उद्या जनतेचा मुख्य प्रवाहातील मीडियावरचा विश्वास आणखी कमी होईल आणि वर्तमानपत्रे व न्यूज चॅनेल्स अप्रासंगिक ठरण्यास माध्यमे स्वतःच जबाबदार राहतील.
*नम्र पण ठाम आवाहन* - तमाम पत्रकार बंधू व संपादकांना विनंती आहे की आकड्यांच्या पलीकडचं सत्य जनतेसमोर आणावे.
“विकास” आणि “पक्षांतर” यातील फरक स्पष्ट करावा.
सत्ताधाऱ्यांना कठोर, थेट आणि निर्भीड प्रश्न विचारावेत कारण सत्य दाखवणारा आरसाच लोकशाही जिवंत ठेवतो.

