नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
श्री साई संस्थान एम्प्लॉइज क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने मकरसंक्रांत २०२६ हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला. महिला भगिनींच्या आनंदाचा सोहळा असलेला हळदी कुंकू समारंभ निमित्त अतिशय आगळा वेगळा आणि साईंच्या नगरीत प्रथमच उपस्थित महिला,लहान मुले आणि पुरुषांच्या मनात काय आहे हे अगदी अचूकपणे ओळखणारा समीर ज्ञानेश्वर यांचा मनकवडा हा अद्भुत कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याने सोसायटीच्या आजवरच्या इतिहासात प्रथमच महिलांनी तुडुंब गर्दी करत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला
सुरुवातीला जादूचे काही प्रयोग दाखवत महिला भगिनींची उत्सुकता समीर ज्ञानेश्वर यांनी वाढविली व त्यानंतर प्रमुख पाहुणे असलेल्या श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सौभाग्यवती सौ वंदनाताई गाडिलकर यांनाच व्यासपीठावर बोलवत डोळे झाकून न पाहता हातातील चिन्हे ओळखून दाखवत उपस्थितांना आश्चर्यचकित केले व कार्यक्रमात पुढे काय काय होणार याची कल्पना दिली
सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, व्हा चेअरमन पोपटराव कोते यांसह महिला संचालक व संचालक मंडळाच्या वतीने अतिशय नियोजनबध्द कार्यक्रमाची रुपरेषा आखण्यात आली होती तर महिला भगिनींसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून ११ पैठणी ठेवण्यात आल्या होत्या यातील पहिल्या पैठणीचे विजेते सुनील कोते यांना सौ वंदनाताई गाडिलकर यांच्या हस्ते सपत्नीक पैठणी साडी देण्यात आली.
यावेळी उपस्थित महिला भगिनींना कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आपल्या अनोख्या शैलीने समीर ज्ञानेश्वर यांनी अखेरपर्यंत खिळवून ठेवले. तुडुंब भरलेली गर्दी देखील रात्री अकरा वाजेपर्यंत देहभान विसरून या अनोख्या कार्यक्रमात दंग होऊन गेली.
यावेळी चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार पा, व्हा. चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. संचालक महादु बापुसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलींद यशवंत दुनबळे, तुळशिराम रावसाहेब पवार पा., रविंद्र बाबु गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इकबाल फकिरमहंमद तांबोळी, सौ सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., रंभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लबडे पा., सचिव विलास गोरखनाथ वाणी पा. सह सचिव बाबासाहेब शंकर अनर्थे पा., सहाय्यक सह सचिव संभाजी सोपान कोते पा. व कर्मचारी वर्ग उपस्थित होते व सुत्र संचालन श्री तिडके सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सभासद व सोसायटी कामगार परिश्रम घेतले आभार संचालक श्री राम गागरे यांनी केले.
उपस्थित सभासद बंधु भगिंनाना रात्री उशिरा पर्यंत वाटप चालु होते उर्वरित सभासदांना मात्र तांत्रिक अडचणीमुळे वाटप दि. २१/१/२०२६वार बुधवार रोजी दुपारी १२ वाजेनंतर संस्थेचे कार्यालय साई उद्यान इमारत येथे करण्यात येईल याची सभासदांनी नोंद घ्यावी.सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले आहे.

