नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
*धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील नूतन विद्यालय येथील शिक्षक श्री. सुनिल काशिराम शिरसाठ हे नुकत्याच झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत(TET)१५० पैकी ९९ गुण मिळवून पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले. सर्वोच्च न्यायालयाने २०२७ पर्यंत सर्वांना शिक्षक पात्रता परीक्षा सक्तीने केली आहे.म्हणून त्यांनी ही परीक्षा देण्याचे ठरवले.वास्तविक त्यांना ही परीक्षा सक्तीची नव्हती पण परीक्षेचे स्वरूप कसे असते.यासाठी फार्म भरला व पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.यासाठी त्यांना नियमितपणे वाचन केलाचा तो फायदा त्यांना झाला. म्हणून वाचन करित रहावे. वाचन केलेले कधीही वाया जात नाही. वाचनामुळे मनुष्य प्रगल्भ होतो. सदसद्विवेकबुद्धीने वागू लागतो.*
*शिरसाठ सरांना विचारले असता हा अभ्यास आपण कसा केला. तर उत्तर मिळाले.शाळेतील विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान स्पर्धा घेणे, नेत्यांची भाषणं विद्यार्थ्यांकडून तयार करून घेणे,वर्षातील शासकीय जयंती,पुण्यतिथी व दररोज वर्तमानपत्र वाचून फायदा झाला. तसेच माध्यमिक अभ्यासक्रम पाचवी ते दहावीचे इतिहास पुस्तकं, पाचवी ते दहावीचे भूगोल पुस्तकं, पाचवी ते दहावीचे विज्ञान पुस्तकं,पाचवी ते दहावी गणिताची पुस्तकं, पाचवी ते दहावी मराठी व्याकरण,पाचवी ते दहावी हिंदी व्याकरण, पाचवी ते दहावी इंग्रजी व्याकरण, नागरिक शास्त्र, या पैकी अभ्यासक्रम असतो.हे क्रमिक पुस्तके वाचली तर यश हमखास मिळतो.इतिहास म्हटलं म्हणजे पाषाण युगापासून तर आता पर्यंत, भूगोल म्हटलं म्हणजे जग,भारत व महाराष्ट्रातील प्रश्न विचारले जातात.*
*वरील विषयावर आधारित तुम्ही कोणत्याही प्रकारचे चार विषय निवडून परीक्षा देऊ शकतात. व पाचवा विषय असतो.तो म्हणजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा विषय सक्तीचा असतो. भारतातील कोणत्याही भाषेत हा पेपर आपण देऊ शकतो.भाषा निवडीचा अधिकार संबंधीत परीक्षार्थींना असतो.*
*परीक्षेला नकारात्मक विचार न करता सकारात्मक विचार केल्यावर व अभ्यास केल्यानंतर यश हमखास मिळते. हा संदेश त्यांनी दिला.*

