शिर्डी प्रतिनिधी: (तुषार महाजन)
न्याहळोद येथील सम्राट तालमीचा पैलवान सिद्धार्थ वाघ यांनी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत थायलंडचा पहिलवानला चिटपट करून गोल्ड मेडल मिळवून मायदेशी परतला आहे.
मलेशिया येथील कोललामरामपूर येथे घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना समिती वर्ड फेडरेशन ऑफ ऑलम्पिक गेम्सद्वारे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने भारतातील काही पैलवान मलेशिया येथे कुस्ती खेळण्यासाठी गेले होते त्यात न्याहाळोद येथील सम्राट विजय व्यायाम शाळेचा मल्ल सरपंच कविता वाघ यांचा चिरंजीव सिद्धार्थ प्रकाश वाघ याने मलेशिया व थायलंडच्या पैलवानाला आपले गुण कौशल्य दाखवून कुस्तीचे विविध डावपेच दाखवून गुण मिळवत कुस्ती चित्रपट करून गोल्ड मेडल पटकावले असून न्याहळोद येथील प्रथमच आंतरराष्ट्रीय कुस्ती खेळणारा मल्ल ठरला आहे. त्याची विदेशातून घर वापसी झाल्यावर मित्रपरिवार आप्तेष्टांनी फटाके वाजवून व पुष्प वर्षाव करून त्याचे स्वागत केले. विविध स्तरावरून सोशल मीडियावर शुभेच्छांच्या वर्षाव होत आहे. सम्राट तालमीचे संस्थापक देविदास जिरे, सरपंच कविता वाघ, माजी सरपंच दिलीप भोगे,अशोक वाघ, विशाल रायते, प्रकाश वाघ, ज्ञानेश्वर भोगे,प्रशांत अहिरे, दीपक वाघ,कैलास पाटील, प्रकाश वाघ, आदींनी त्याला शुभेच्छा दिल्या.

