शिर्डीच्या विकासाला मिळणार गती; विविध समित्यांवर तज्ज्ञ सभापतींची बिनविरोध निवड
शिर्डी प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
शिर्डी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतीपदाच्या निवडणुका आज अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. या विशेष सभेत सर्व पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध घोषित करण्यात आल्याने शहरात आनंदाचे वातावरण आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि अधिकारी माणिकराव आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी पक्षभेद विसरून विकासाच्या मुद्द्यावर भर देत सर्व सदस्यांनी बिनविरोध निवडीला पसंती दिली.
नवनिर्वाचित सभापतींची यादी खालीलप्रमाणे:
नियोजन समिती सभापती: सार्वजनिक बांधकाम सभापती: अरविंद सुखदेव कोते, स्वच्छता व आरोग्य सभापती: दीपक रमेश गोंदकर, महिला व बालकल्याण समिती सभापती: सौ. सुनीता वसंत गोंदकर, पाणीपुरवठा सभापती: सौ. कोमल किरण बोराडे, निवडीनंतर नगराध्यक्षा सौ. जयश्रीताई थोरात यांच्या हस्ते महिला सभापतींचा, तर अधिकारी माणिकराव आहेर यांच्या हस्ते पुरुष सभापतींचा सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे शिर्डी शहराच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

