shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेटेवाडी येथे संक्रांतीचा वाण वाटप व महिला मेळावा संपन्न.

वाळकी प्रतिनिधी : मांडवगण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,शेटेवाडी येथे संक्रांती वाण वाटपानिमित्त महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता.हळदी-कुंकू पारंपरिक संस्कृतीचे जतन करणारा सोहळा आहे. या कार्यक्रमाने महिला एकत्र येऊन आपल्या विचारांची देवाण-घेवाण करत असतात. अशा कार्यक्रमातून महिला सशक्तीकरणाला दिशा मिळत असते. त्यामुळे महिलांमध्ये सामाजिक बांधिलकी व सामाजिक ऐक्याची भावना निर्माण होण्यास मदत होते.


       यावेळी उपस्थित महिलांना वाण वाटप करण्यात आले.तसेच निवृत्त मुख्याध्यापिका सौ.आशा शेटे-काकडे यांचा काव्य गायनाचा कार्यक्रम पार पडला.सामाजिक कार्यकर्त्या सौ.आरती लोखंडे यांनी स्री शिक्षण व महिलांचे आरोग्य या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करताना आई व शिक्षक हेच मुलांचे उज्वल भवितव्य घडवू शकतात असे सांगितले.यानिमित्ताने महिलांसाठी संगीतखुर्ची,मनोरा रचणे,प्रश्नमंजुषा इ स्पर्धांचे आयोजन करुन विजेत्यांना बक्षिसे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फुर्त सहभाग मिळाला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्योती भालसिंग,मिराताई शेटे,अश्विनी घोडके,योगिता शेटे यांनी परिश्रम घेतले.
close