shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घर बचाओ समीतीच्यावतीने खा.सुजय विखे पाटील यांना निवेदन


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील रेल्वे प्रशासनाने रेल्वे लाईन शेजारील स्वतः च्या मालकीच्या जागेतील घर आणी दुकानदारांना जागा खाली करण्याबाबत नोटीसा धाडल्या आहेत,
रेल्वे प्रशासनाच्या या अन्यायकारक भुमिकेमुळे सदरील क्षेत्रातील नागरीक खुपच हवालदिल झाले असुन समीतीच्यावतीने धरणे, आंदोलने,मोर्चे आदी द्वारे रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत.


शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांना सदरील बाबी पुर्वीच निवेदन देण्यात येवून परीसरातील नागरीकांच्या समस्या समजावून सांगितल्या आहेत,त्यावर घर बचाओ संघर्ष समिती आणि संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन हा प्रश्न सोडविणार असल्याचे खा.लोखंडे यांनी सांगितलेले आहे,

तसेच नुकताच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजयदादा विखे पाटील यांना संबंधित बाबी घर बचाओ संघर्ष समितीच्यावतीने नुकताच निवेदन देण्यात आले,तथा सदरील प्रकरणी जातीने लक्ष घालण्याची विनंती देखील करण्यात आली आहे, उत्तर आणि दक्षिण असे दोन्ही कडील विद्यमान खासदारांनी लक्ष घातल्यास रेल्वे प्रशासनास उचित निर्णय घेणे भाग पडेल आणी हवालदिल झालेले नागरीकांना मोठा दिलासाही मिळेल.

सदरील प्रकरणी श्रीरामपूर शहरातील सर्वच राजकीय पक्ष, विविध राजकीय,सामाजिक संघटना या घर बचाओ संघर्ष समितीच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत, सोबतच घर बचाओ संघर्ष समितीच्यावतीने शासन दरबारी पत्रव्यवहाराद्वारे योग्य पाठपुराव्याचा संघर्ष चालूच आहे, यामुळे लवकरच परिसरातील घर आणि दुकानदारांना मोठा दिलासा मिळेल असे दिसून येत आहे.

सदरील निवेदन देतेवेळी घरबचाओ संघर्ष समितीचे अशोकभाई बागुल,हाजी मुख्तारभाई शहा,दीपक चव्हाण, रियाजखान पठाण, अनिल इंगळे, नागेशभाई सावंत,तिलक डुंगरवाल,जाफरभाई शहा, संजय गांगड, युवराज घोरपडे, नाना गांगड, महेबूब शेख,अलिम शेख आदि उपस्थित होते.

सहयोगी:
पत्रकार रियाजखान पठाण, श्रीरामपूर
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close