shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साईचरणी दानशूरता! टाटा मोटर्सच्या पुणे रिजन डीलर्सकडून २५ लाखांची 'टाटा सिएरा' अर्पण


श्री साईबाबा संस्थानच्या ताफ्यात नवी 'टाटा सिएरा'; टाटा मोटर्सकडून २५ लाखांचे वाहन सप्रेम भेट

नगर प्रतिनिधी: ( तुषार महाजन )
जागतिक कीर्तीच्या श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात वाहने अर्पण करण्याची परंपरा भाविकांकडून आणि विविध संस्थांकडून अविरत सुरू आहे. याच शृंखलेत आज टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या सर्व अधिकृत डीलर्सच्या वतीने तब्बल २५ लाख ६९ हजार १९३ रुपये किमतीची 'टाटा सिएरा' ही अत्याधुनिक चारचाकी गाडी संस्थानला देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली.
या नवीन वाहनाचे पूजन आणि हस्तांतरण सोहळा आज उत्साहात पार पडला. संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) आणि टाटा मोटर्सच्या डीलर्सच्या हस्ते या वाहनाचे विधिवत पूजन करण्यात आले. नारळ ओवाळून आणि फुलांची माळ अर्पण करून गाडीची चावी अधिकृतरीत्या संस्थानकडे सुपूर्द करण्यात आली.
साईबाबांच्या चरणी सेवा म्हणून हे वाहन दिल्याची भावना यावेळी टाटा मोटर्सच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. या देणगीबद्दल श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी टाटा मोटर्स, पुणे रिजनच्या सर्व उपस्थित डीलर्सचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार केला आणि त्यांचे आभार मानले.
संस्थानच्या वाहन ताफ्यात या नवीन गाडीचा समावेश झाल्यामुळे भाविकांच्या आणि संस्थानच्या सेवेत आणखी भर पडली आहे.
close