पळसदेव पंचायत समिती गणातून वर्षा सुरज काळे यांचा शिवसेनेतून भरला उमेदवारी अर्ज.
इंदापूर : पळसदेव पंचायत समिती गणातून सौ. वर्षाताई सुरज काळे यांनी शिवसेनेतुन उमेदवारी अर्ज दाखल केला.
सौ.वर्षाताई सुरज काळे यांचा पळसदेव पंचायत समिती गणातून शिवसेना (शिंदेगट) पक्षातर्फे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून
इंदापूर तालुक्यात यावर्षी प्रथमच शिवसेना पक्षातर्फे सहकार सेनेचे उपाध्यक्ष सुरज काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच लढत देण्याच्या तयारीने शिवसेना पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरलेला दिसून येत आहे.
वर्षा सुरज काळे यांच्याकडे विशेष कार्यकारी अधिकारी हे पद 2018 ते 2023 या कालावधीमध्ये होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केले. हे पद त्यांना शिवसेनेच्या वतीने मिळालेले होते. त्यांनी पक्षाच्या माध्यमातून जनसामान्यांचे विविध प्रकारच्या कामांना व प्रशासना संबंधी तसेच इतर शासकीय कार्यालयाशी संबंधित कामकाजामध्ये मदत केली. तसेच विविध सामाजिक उपक्रम या माध्यमातून सामान्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचे पती आज तागायत काम करत आहेत.
तसेच उजनी प्रकल्पग्रस्तांच्या गाळपेर जमिनी व पाण्यामध्ये न जाणाऱ्या जमिनी ह्या स्थानिक शेतकऱ्यांनाच कसण्यास व परत मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे सांगितले.

