*व्याहाळी शाळेची समृद्धी दिवसे जिल्ह्यात अव्वल.*
*कला क्रीडा महोत्सव जिल्हा स्पर्धेत लांब उडी मध्ये मिळवला प्रथम क्रमांक.*
इंदापूर: दि २० पुणे जिल्हा परिषद पुणे यांच्या वतीने दरवर्षी जिल्हा परिषद शाळेतील मुलांच्या कला क्रीडा गुणांना वाव मिळावा म्हणून यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. जिल्हास्तरीय कला क्रीडा महोत्सव दि २० रोजी फुलगाव सैनिकी स्कूल येथे सुरू झाल्या. यामध्ये पहिल्या दिवशी मोठा गट पाचवी ते आठवी या गटाच्या स्पर्धा संपन्न झाल्या. मैदानी स्पर्धेत व्याहाळी शाळेची *समृद्धी महादेव दिवसे इ ६ वी हिने लांब उडी १३ तालुक्यातील स्पर्धा मधून २० सेंमी च्या फरकाने 3.92 मीटर उडी मारून प्रथम क्रमांक मिळवला. प्रथम क्रमांकाचे सन्मान चिन्ह प्रमाणपत्र शिक्षण अधिकारी पुणे संजय नाईकडे यांचे हस्ते देण्यात आले.*
*पंचायत समिती इंदापूरचे गटविकास अधिकारी सचिन खुडे साहेब , गटशिक्षणाधिकारी निलेश गवळी साहेब , विस्तार अधिकारी सुनील मुगळे साहेब , केंद्रप्रमुख संभाजी आजबे* यांचे सह पालक ग्रामस्थ शाळा समिती पदाधिकारी सर्वांनी समृद्धीचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक रामकृष्ण निंबाळकर पदवीधर शिक्षक प्रभाकर लावंड उपशिक्षक तात्याराम धायतोंडे खुशाली धायतोंडे , कैलास गावडे व संतोष हेगडे यांनी मार्गदर्शन केले.

