श्रीरामपूर प्रतिनिधी:
इंदिरानगर येथील माजी मुख्याध्यापक व साहित्यिक भागवतराव मुठे पाटील यांच्या शैक्षणिक आणि साहित्यिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील यांनी खासदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेत दीर्घकाळ प्रामाणिकपणे कार्य केले, त्याचबरोबर आदिक साहेबांनी स्थापन केलेल्या साहित्यशिल्प या मोठे संघटनेत योगदानही दिले आहे.
कथा, नाटक, धार्मिक साहित्य लिहिण्याबरोबरच श्रीमत भागवत ग्रन्थाचे सोप्या भाषेत अनुवाद देखील त्यांनी केले आहे,अशा या त्यांच्या शैक्षणिक / साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्वश्री गोकुळ भागडे, संभाजी भागडे, विलासराव भागडे, संजय भागडे यांच्यावतीने शैक्षणिक,साहित्यिक गौरव करत त्यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी मुख्याध्यापक भागवतराव मुठे पाटील यांनी आभार मानले.
*संकलन:*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

