प्रकाश मुंडे / प्रतिनिधी :-
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होणाऱ्या दि.14 .10.2023 रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराठी येथे होणाऱ्या सभेसाठी संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज एकवटणार असुन त्या साठी या सभेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी फराळाचा नाष्टा, पोहे, बिसलरी पाणी बॉटल व चहाचे नियोजन केज येथे महामार्गावरील लक्ष्मी नगर समोरील आतुल इंगळे यांच्या डि. पी. कारखान्याच्या (व्हिजन ट्रान्सफॉर्मर कंपनी) च्या समोर
बीड रोड केज येथे होणार असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुंदडा परिवाराचे कट्टर समर्थक युवा नेते आतुल इंगळे, आतुल इंगळे मिञ परिवार व सकल मराठा संघ केज यांनी केले आहे.
नांदेड,लातुर व धाराशिव या जिल्ह्यातील गाड्या या मार्गावरून जाणार असुन या उपक्रमाचा लाभ होणार आहे.
सकाळी सहा ते दुपारी बारा या वेळेत हा उपक्रम होणार असल्याचे आतुल इंगळे, आतुल इंगळे मिञ परिवार केज व सकल मराठा संघ केज च्या वतीने कळविले आहे.