shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यालय उमरी च्या यशाची परंपरा कायम..!!


प्रकाश मुंडे / बीड जिल्हा प्रतिनिधी:-
महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या पावसाळी क्रीडा स्पर्धांना उत्साहात सुरुवात झालेली आहे. या क्रीडा स्पर्धा तालुकास्तरावर पार पडल्या तर दिनांक 10/10/2023 रोजी सैनिकी विद्यालय बीड येथे जिल्हा स्तरावरील स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेमध्ये माऊली विद्यापीठ केज संचलित माध्यमिक विद्यालय उमरी या शाळेतील विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा रामराव भुसारे हिने ट्रिपल जंप या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संपादित केला आहे. 

ती आता परभणी या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे माऊली विद्यापीठाचे अध्यक्ष माननीय अशोकरावजी पाटील, खासदार रजनीताई पाटील, सचिव आदित्य दादा पाटील, प्रशासकीय अधिकारी मोरे सर, शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सत्वधर सर सर्व कर्मचारी वृंद यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
close