shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष अंबादास दहिदुले तर सचिव पदी सत्यजित तानाजी रणवरे यांची निवडीबद्दल सन्मान.

 

जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष अंबादास दहिदुले तर सचिव पदी सत्यजित तानाजी रणवरे यांची  निवडीबद्दल सन्मान.
 इंदापूर प्रतिनिधि :     वालचंदनगर (ता. इंदापूर) येथे नुकतेच श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ वालचंदनगर यांच्याकडून नुकतेच 'ललित पंचमी' निमित्त आयोजित कार्यक्रमासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या नुतन अध्यक्ष व सचिवपदी निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.


                       येथील मेन काॅलनीलगत देवघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरामध्ये विविध विषयांवर श्री स्वामी समर्थ मंडळ , वालचंदनगर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी  ललित पंचमी दिवशी अक्कलकोट मध्ये श्री स्वामी समर्थांचे प्रथम दर्शन झाल्याने याच ललित पंचमी दिवशी सर्वत्र भाविकांकडुन मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यानिमित्त नियोजन करण्यासाठी श्री स्वामी समर्थ मंडळाचे पदाधिकाय्रांची 'आढावा बैठकीचे' आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी साधक-बाधक चर्चा होऊन एकमत होत सुंदर असा कार्यक्रम करण्याचा मानस यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

         दरम्यान महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या इंदापूर तालुका पत्रकार आघाडीच्या अध्यक्षपदी संतोष अंबादास दहिदुले तर सचिव पदी सत्यजित तानाजी रणवरे यांची नुकतीच बिनविरोध नूतन निवडीबद्दल मंडळाच्या वतीने डॉ. विकास शहा, राम कुंभार त्यांच्या  हस्ते शाल, श्रीफळ, फेटा व हार देऊन उचित असा सत्कार करण्यात आला.यावेळी स्वामी समर्थ सेवा मंडळ चे पदाधिकारी उमेश सगरे, अमोल रजपूत, निलेश चव्हाण, विजू कांबळे , मुन्ना भरते, स्वप्निल आचलारे, चिंटू कंदले , विकास शेटे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

 
close