इंद्रेश्वरी अनिकेत वाघ महाराष्ट्र राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक अंकगणित स्पर्धेमध्ये द्वितीय.
इंद्रेश्वरी अनिकेत वाघ हीचे मान्यवरांनी सत्कार करून केले अभिनंदन .
इंदापूर प्रतिनिधि: राधिका माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष व इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद विष्णू वाघ यांची नात व इंदापूर नगरपालिकेचे नगरसेवक अनिकेत अरविंद वाघ यांची कन्या कुमारी इंद्रेश्वरी अनिकेत वाघ हिने नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय अबॅकस व मानसिक अंकगणित स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा अभिनंदन सोहळा अॅड. . मनोहर चौधरी सचिव इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांचे शुभ हस्ते तसेच
अॅड. रणजीत चौधरी , अंकुश पाडूळे, संदिपान कडवळे , प्रकाश खाम्बसवाडकर , महादेव चव्हाण, हमीद आतार,ओंकार शहा ,स्वप्नील महाजन,श्रीकांत मखरे ,उमेश महाजन ,सौरभ नागपुरे , गौरव महाजन यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .