कन्यादिन गौरवाचा
आहे जीवनसौख्याचा
कन्या असे भाग्यवान
घरी हा वास लक्ष्मीचा
कन्या असे ज्या घरात
तेथे सरस्वती नांदे
बुद्धी,भावना,समृद्धी
सासर, माहेर सांधे
कन्या म्हणजे प्रकाश
दीप उजळे घरात
घरी दारी सौभाग्याचा
देव हसे देवळात
कन्यादीप, कन्यादान
असे संस्कार लग्नात
भाऊ, बहीण नात्याचा
सुंदर गोफ नात्यात
अर्धनारी नटेश्वर
जगाचे संसार रूप
कन्याजन्म आनंदाचा
आहे कर्म पृथ्वीरूप
कन्यादिनी ओवाळावे
स्त्रीजन्मास ह्या वंदावे
सार्थ गौरव करावा
कन्यादिनास नमावे !
=डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर 9270087640