*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काझड या ठिकाणी नवरात्र उत्सवानिमित्त भोंडला कार्यक्रमाचे आयोजन.*
इंदापूर प्रतिनिधि:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काझड तालुका इंदापूर जिल्हा पुणे या ठिकाणी दिनांक 21/ 10/ 2023 रोजी महा भोंडला घेण्यात आला. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थिनींनी तसेच अंगणवाडीने सुद्धा सहभाग घेतला .सर्व महिला शिक्षिकांनी हत्तीच्या मूर्तीचे पूजन केले. विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांना आनंद मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध सांस्कृतिक उपक्रम राबवले जात असतात. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काझड शाळेमध्ये भोंडला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना गुणवत्तेबरोबरच त्यांच्यात वरती सामाजिक व सांस्कृतिक संस्कार व्हावेत हा त्यामागचा हेतू होता. विद्यार्थ्यांना भारतीय परंपरेची आणि संस्कृतीची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमामध्ये मुलांनी वेगवेगळी वेशभूषा करून विविध गाण्यांवरती नृत्य व दांडिया खेळण्याचा आनंद घेतला शिक्षक ही त्यामध्ये मनापासून सहभागी झाले विद्यार्थ्यांचा उत्साह फार मोठा दिसून आला त्यामुळे कार्यक्रम आणखी रंजक झाला सौ कारंडे मॅडम यांनी भोंडल्या विषयी सविस्तर माहिती सांगितली. इंदापूर तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. नानासाहेब नरुटे यांच्या हस्ते हत्तीचे महापूजन करून प्रसाद वाटप करण्यात आला . सौ. लाळगे मॅडम यांनी' ऐलमा पैलमा' हे गीत गायले .सर्व मुलींनी गोल फेर धरून गाणी म्हटली .'अंबे कृपा करी' याचबरोबर आणखी गाण्यांवर सर्व मुलींनी दांडिया डान्स खूप छान सादर केला. शाळेचे मुख्याध्यापक श्री धायगुडे सर ,गवळी सर, शिंदे सर लाळगे सर, साबळे सर ,माळवे सर यांनी देखील दांडीयांचा मनसोक्त आनंद लुटला. श्री शिंदे सरांनी व माळवे सरांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

