निमसाखर येथे समस्त मराठा बांधव यांच्या वतीने साखळी उपोषण.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे समस्त मराठा बांधव यांच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासाठी साखळी उपोषणाला आजपासून सुरुवात करण्यात आली असून यासंबंधी ग्रामपंचायत निमसाखरचे सरपंच धैर्यशील रणवरे यांनी तहसीलदार इंदापूर यांच्या नावे निवेदन पत्राद्वारे कळवले असून सदर नियोजन पत्रात म्हटले आहे की, मौजे निमसाखर येथील समस्त मराठा बांधव या पत्राद्वारे एकमताने कळवत आहोत की, आमच्या मराठा समाजास कायदेशीर ओबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण मिळेपर्यंत आम्ही सर्वजण सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावात येण्यास व सभा घेण्यास बंदी घालत आहोत सदर प्रत प्रांत अधिकारी बारामती, पोलीस निरीक्षक इंदापूर यांना देण्यात आलेले असून यानुसार साखळी उपोषणास मराठा बांधव मोठ्या संख्येने निमसाखर येथे उपस्थित असल्याचे दिसून आले.

