shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निहाळोद येथे तब्बल 37 वर्षानंतर वर्गमित्र भेटले... मोठ्या उत्साह स्नेहामेळावा संपन्न..!


स्नेह मेळावा माजी विद्यार्थी आठवणीचे सुवर्णक्षण

शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन )
 सामाजिक बातमी

      निहाळोद येथे नुकताच स्नेहमेळावा पार पडला. हो तब्बल 37 वर्षानंतर 1986/87 बॅचचे नुतन विद्यालय निहाळोद ता.जि. धुळे ह्या शाळेचे 10 वीचे वर्गमित्र एकत्र आले. प्रत्येक वर्गमित्राने एकमेकांची गळाभेट घेऊन शब्दसुमनांनी स्वागत केले. बऱ्याच वर्षानंतर एकत्र आल्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनोगत व्यक्त करतांना सर्व मित्रांनी दरवर्षी अशाच प्रकारे एकत्र यावे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हावे. तसेच पुढचा स्नेहमेळावा सहकुटुंब घ्यावा विचार व्यक्त केला.

      या कामी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी विजय पवार, कैलास पाटील, सुनील भावसार, संजय महाजन, मच्छिंद्र कोळी, रवींद्र वाडिले, भिमराव रोकडे, सतिष जाधव, कैलास रोकडे, रवींद्र चव्हाण, साईनाथ वाडिले, सुनील पवार, गणेश वाघ, कैलास वसंत पाटील, मिलिंद भावसार, अशोक चव्हाण, विजय सोनवणे आदिंनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. विशेष हजेरी श्री. चंद्रकांत शिंदे साहेब दामिनी पथक धुळे हेसुद्धा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.

     सुत्रसंचालन विजय सोनवणे यांनी केले आणि आभार गणेश वाघ यांनी मानले. कार्यक्रम आणि स्नेहभोजनाची संपुर्ण व्यवस्था गणेश वाघ यांनी केली स्नेह मेळावा मिलिंद भावसार यांच्या मळ्यात करण्यात आली होती.

     याप्रसंगी पत्रकार संजय महाजन म्हणाले की, एकंदरीत कार्यक्रम खुपच छान झाला. आनंद झाला. योग यावा पुन्हा भेटिचा सोहळा पाहिला मैत्रीचा, सर्व मित्रांनी फोनवर प्रतिसाद दिला आणि आपला बहुमुल्य वेळ दिला त्याबद्दल स्वतः सर्वांचे आभार मानतो.

close