*गौराईमळा शाळेत संविधान दिन साजरा*..
इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २६ नोव्हेंबर जि प प्राथमिक शाळा गौराईमळा शाळेत संविधान दिन मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नंतर
संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले. वाचना नंतर २६/११ च्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिक व शहीद झालेल्या पोलिसांना आदरांजली वाहण्यात आली. मुख्याध्यापक प्रताप शिरसट सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले. भारतीय संविधान दि. २६ नोव्हेंबर निमित्त संविधानाचा परिचय होऊन सुजाण आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलभूत हक्क व कर्तव्यांविषयी जाणीव व्हावी तसेच मुलांना संविधाना विषय आदर व महत्त्व माहिती व्हावे म्हणुन मुलांना मार्गदर्शन करण्यात आले.

