shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे 5 डिसेंबर रोजी आयोजन


अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
 जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा कृषि अधिक्षक कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 5 डिसेंबर, 2023 रोजी सरदार पटेल कार्यालय, हॉटेल राज पॅलेस शेजारी, टिळक रोड, अहमदनगर येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जिल्हयातील कृषि महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच १५ ते २९ वयोगटातील युवकांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले
 आहे.
युवकांचा सर्वांगीण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय व राज्यस्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याच अनुषंगाने या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  युवा महोत्सवामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कौशल्य विकासमध्ये कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा (इंग्रजी व हिंदी), फोटोग्राफी, संकल्पना आधारित स्पर्धेमध्ये तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर व सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान तसेच युवाकृतीमध्ये हस्तकला, वस्त्रोद्योग व ॲग्रो प्रॉडक्ट आदी स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले आहे.

 स्पर्धेमध्ये सहभागासाठी १५ ते २९ वयोगटातील (दि. ०१ एप्रिल, २०२३ रोजी वयाबाबत परिगणना करावी) युवक व युवती यांना प्रवेश देण्यात येईल. तसेच स्पर्धेमध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या स्पर्धकांना रोख पारीतोषिक व प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.                     

 

*दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता नवीन वाहन मालिका सुरू*

*इच्छुकांनी 4 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन*

अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
दुचाकी संवर्गातील नवीन वाहनांकरीता नवीन वाहन मालिका सुरू करण्यात येत असुन इच्छुक अर्जदारांनी  4 डिसेंबर, 2023  रोजी सकाळी 10.00 ते सायं.4-00  वाजेपर्यंत पसंती क्रमांकाच्या विहीत शुल्काच्या डिमाड ड्राफ्टसह अर्ज चांदणी चौकातील नवीन इमारतीत खिडकी क्रमांक 14  येथे जमा करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

अर्ज सादर करताना वाहन ज्याच्या नावावर असेल त्या व्यक्तीच्या नावाच्या अर्जासोबत त्यांचा पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड, आधार कार्डला सलंग्न असलेला भ्रमणध्वनी क्रमांक नमुद करणे आवश्यक आहे. पसंती क्रमांक डिमांड ड्राफ्ट अहमदनगर कॅम्प बेंच, ट्रेझरी बॅच कोड नं १३२९६ करीता देय असणे आवश्यक आहे.
एका पसंती क्रमांकासाठी एकच अर्ज आला असेल त्यांची व एकाच पसंती क्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आले असतील त्यांच्या पसंती क्रमांकाची यादी 4 डिसेंबर, 2023  रोजी सायं. 6.00 वाजता  वाजता चांदणी चौक येथील नवीन इमारतीत नोटीस बोर्डवर प्रदर्शित करण्यात येईल. एकाच पसंतीक्रमांकासाठी दोन किंवा दोनपेक्षा जास्त अर्ज आलेल्या यादीमधील पसंतीक्रमांसाठी ज्यांनी अर्ज केला आहे, अशा अर्जदारांनी 5 डिसेंबर, 2023 रोजी सायं. 4.30 वाजता पसंती क्रमांक शुल्काच्या डिमांड ड्राफ्ट व्यतिरिक्त जादा रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सिलबंद करून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दालनात उपस्थित रहावे, तसेच लिलावासाठी उपस्थित राहणा- या अर्जदाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने ओळखपत्र व प्राधिकार पत्रासह हजर रहावे.
 कार्यालयात सादर झालेले जादा रक्कमेचे डिमांड ड्राफ्ट अर्जदारासमोर उघडण्यात येतील. ज्या अर्जदाराने जास्त रक्कमेचा ड्राफ्ट सादर केला असेल त्याला तो पसंती क्रमांक देण्यात येईल व उर्वरित कमी रक्कमेचा ड्राफ्ट संबंधित अर्जदानांना परत देण्यात येईल. विहीत वेळेत अनुपस्थित अर्जदारांचा कुठलाही प्रकारचा विचार केला जाणार नाही. पसंती क्रमांकासाठी कोणत्याही अर्जदारास दुरध्वनी, भ्रमणध्वनी अथवा एसएमएस केला जाणार नाही याची नोंद घेण्याचे आवाहनही प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
9561174111
close