वडाळा महादेव प्रतिनिधी:
समाज आणि संस्कृती ही मानवी जीवनाला नीतीचे अधिष्ठान देणारे मूलभूत आधारखांब आहेत, त्यामध्ये संत आणि साहित्यिक हे समाजसंस्कृतीचे शिल्पकार आहेत, असे विचार शेवगाव येथील ह.भ.प. प्रा. डॉ. वसंत शेंडगे महाराज यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे संतकार्य आणि साहित्यनिर्मितीबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील आध्यात्मिक क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तिमत्व ह. भ.प.प्रा. डॉ.वसंत शेंडगे महाराज यांना इगल न्यूजतर्फे जीवन गौरव पुरस्कार नुकताच प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी डॉ.शेंडगे महाराज बोलत होते.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविक करून जीवन गौरव पुरस्कार आणि डॉ. शेंडगे महाराज यांचा परिचय करून देऊन सौ विद्याताई शेंडगेताईसह सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादासाहेब बर्वे, पत्रकार राजेंद्र देसाई, फकिरा वाघमारे,शशिकांत बर्वे, पुंडलिक खैरनार, संतोष महापुरे, श्रीवेद देसाई संजय त्रिभुवन, गोरक्षनाथ त्रिभुवन आदिंनी शेंडगे महाराज यांचा सन्मान केला.मुख्याध्यापक बर्वे यांनी डॉ शेंडगे महाराज यांच्या आदर्श आध्यात्मिक कार्याचे कौतुक केले अशी संतवृत्तीची व्यक्तिमत्वे समाजाला भूषणावह आहेत त्यांनी केलेल्या कार्याचा योग्य सन्मान झाल्याचे सांगितले राजेंद्र देसाई यांनी सत्काराचे नियोजन करून डॉ.शेंडगे महाराज यांच्या कार्याची माध्यमांनी दखल घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला संतसाहित्य पुरस्कार मिळविणारे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी एका समर्पित आध्यामिक व्यक्तीचा सत्कार त्याबद्दल गौरव उदगार काढून सर्वांचे आभार मानले.सूत्रसंचालन जितेंद्र भारस्कर आणि सौ तृप्ती भारस्कर यांनी केले.
*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

