shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिवाळी साजरी करताना पणतीने भाजल्याने चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू



चाकण : शेलपिंपळगाव ( ता. खेड ) येथील कु. श्राव्या सोमनाथ पोतले ( वय ५ वर्ष ) या चिमुकलीचा दिवाळी साजरी करताना दुर्दैवी मृत्यू झाला. 

पणतीने श्राव्याच्या फ्रॉकला आग लागल्याने श्राव्या भाजली. हि घटना शनिवारी ( दि. ११ ) घडली. तिला भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला उपचारानंतर डिस्चार्ज दिला. रविवारी ( दि. १२ )  पुन्हा तिला त्रास झाल्याने तिला चाकण येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता उपचार चालू असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

"मायबापहो मुलांचे हट्ट पुरवताना काळजी घ्या.. दिवाळी साजरी करताना आपल्या लेकरांना दिवा, पणत्या, फटाके यापासून दूर ठेवा मुलांना योग्य मार्गदर्शन करा.. सुरक्षित रहा..!"

*लाडक्या श्राव्याला भावपुर्ण भावपूर्ण श्रद्धांजली!*
💐🙏🏻😰


close