shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंढरीला ये जा करणाऱ्या भाविकांनी वडापुरी येथील श्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी दर्शवली उपस्थिती


पंढरीला ये जा करणाऱ्या भाविकांनी वडापुरी येथील श्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी दर्शवली उपस्थिती.

फोटो ओळ: १) श्रीनाथ मंदिर वडापुरी चा फोटो.
२)वडापुरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात महा आरतीला उपस्थित भाविक.

वडापुरी प्रतिनिधी :

संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर असणारे वडापुरी (ता. इंदापूर) गाव  असून येथील पौराणिक काळातील श्रीनाथ मंदिर आहे.या  मंदिर परिसरात पंढरपूर कडे विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या जाणारे भाविक दर्शन घेत असल्याचे दिसून आले. 
तसेच वडापुरी येथील कार्तिक एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी सकाळी महाअभिषेक करून आरती करण्यात आली. यावेळी वडापुरी गावातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सर्व भाविक भक्तांना प्रसाद वाटप करण्यात आले. वडापुरी गाव पंचक्रोशीतील भाविक यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजेरी लावून दर्शन घेतले संध्याकाळी हरी भजनाचा जागर भाविकांच्या वतीने होणार आहे.

---------------------------------

close