shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कार्तिक एकादशीनिमित्त शेरकरबाबा महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची हजेरी


कार्तिक एकादशीनिमित्त शेरकरबाबा महाराज मंदिरात दर्शनासाठी भाविकांची हजेरी.
फोटो ओळ:शेरकर बाबा महाराज यांचे पादुका समाधी मंदिरात कार्तिक एकादशीनिमित्त  पंढरपूरला दर्शनासाठी येणारे जाणारे भाविकांनी हजेरी लावली. 

शिर्डी एक्सप्रेस न्युज नेटवर्क : संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर असणारे सुरवड वकीलवस्ती (ता. इंदापूर) परिसरातील वारकरी संप्रदायातील श्रद्धास्थान  शेरकर बाबा महाराज यांचे पादुका समाधी मंदिरात कार्तिक एकादशीनिमित्त  पंढरपूरला दर्शनासाठी येणारे भाविक हजेरी लावत असल्याचे दिसून आले.

इंदापूर तालुक्यातील सुरवड, वकीलवस्ती गावाच्या लगत असणारे शेरकर बाबा महाराज यांच्या समाधी मंदिरात कार्तिकी एकादशीनिमित्त वकीलवस्ती, सुरवड, बावडा, वडापुरी, भोडणी, शेटफळ हवेली, भांडगाव तसेच इंदापूर तालुक्यातील आणि संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरून पंढरपूरकडे जाणारे येणारे भाविक भक्त यांनी (दि. २३) दिवसभर दर्शनासाठी उपस्थिती दर्शवताना दिसून आले.
------------

close