श्रीरामपूर प्रतिनिधी:
नुकत्याच कराड येथे दिनांक १८ व १९ नोव्हेंबर२०२३ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय अमेचूर शूटिंग बॉल असोसिएशन १७ वर्ष वयोगट (मुले) सब ज्यूनियर या स्पर्धेत एकूण आठ विभागांनी सहभाग घेतला या स्पर्धेत डी पॉल शाळेचा खेळाडू सुयश कुऱ्हे याने उत्कृष्ठ खेळाचं प्रदर्शन करून पुणे विभागाचे नाव दुसरा क्रमांकावर झळकावून सुयश कुऱ्हे या खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे.
सदर राष्ट्रीय स्पर्धा ह्या पटणा येथे होणार असून या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शाळेचे अडमिनस्टेटर फादर थॉमस व शाळेच्या मुख्याधापिका सिस्टर सेलिन यांनी सुयश कुऱ्हे याचे कौतुक केले,तसेच या खेळाडूला शाळेचे क्रीडा शिक्षक संदीप निबे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, पटना येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शाळेच्या सेक्रेटरी स्वाती घोरपडे, सोनाली झाजरी, सुनीता सोनवणे, रवींद्र लोंढे सर, बिना कदम,सुनिल बोरगे व शाळेचे सर्व स्टाफने राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुयश ला शुभेच्छा दिल्या.
*पत्रकार दिपक कदम -श्रीरामपूर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

