श्रीरामपूर प्रतिनिधी:
संविधानामुळे देशाच्या लोकशाहिचे बळकटीकरण झाले. स्वातंञ्य, समता, बंधुता या तत्वांचा अंगीकार करणे हेच डाॕ.बाबासाहेब आंबेडकरांना संविधानदिनी अभिवादन ठरेल, असे मत अशोक महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्य सौ.सुनीताताई गायकवाड यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक महाविद्यालयात माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली संविधान दिन संपन्न झाला. याप्रसंगी सौ.गायकवाड बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधानदिन म्हणून साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी त्याची अंमलबजावणी झाली. लोकशाही सक्षमीकरणात संविधानाची भुमिका महत्त्वाची ठरली आहे.
याप्रसंगी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले गेले. याप्रसंगी महाविद्यालयाचे अध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
*पत्रकार इम्रान एस.शेख - श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*

