shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज मतदार संघातील रस्ते होणार चकाचक आ. नमिता मुंदडा यांनी आणला २७ कोटींचा निधी..!!

प्रकाश मुंडे  / बीड जिल्हा प्रतिनिधी:- 

केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे केज विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी कोट्यावधीच्या निधीचा ओघ सुरुच आहे. राज्य शासनाने पुन्हा एकदा आ. मुंदडा यांच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत केज मतदार संघातील ग्रामीण भागातील ११ रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी तब्बल २७ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 


आ. नमिता मुंदडा यांच्या कार्यकाळात केज मतदार मतदार संघावर निधीचा वर्षाव सुरुच आहे. त्यातून अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. दरम्यान, मतदार संघातील ग्रामीण भागातील दैना झालेल्या रस्त्यांच्या कामासाठी आ. नमिता मुंदडा यांनी शासनदरबारी पाठपुरावा सुरु ठेवला होता. पुन्हा एकदा आ. मुंदडा यांच्या मागण्यांची दखल घेत राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात संशोधन व विकास अंतर्गत केज मतदार संघातील रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी २५ कोटी २३ लाख रुपये व पाच वर्षांच्या दुरुस्ती देखभालीसाठी २ कोटी १७ लाख रुपये असा एकूण २७ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. 


या निधीतून केज तालुक्यातील प्रजिमा-३९ ते काळूचीवाडी रस्ता, रामा-२२२ ते लिमनदरा रस्ता, रामा-२२२ ते बुरुंडवाडी रस्ता, प्रजिमा-५४८ ते पन्हाळवाडी रस्ता, रामा-२२२ ते दैठणा रस्ता, प्रजिमा-४० ते खरमाटा रस्ता, राममा-५४८ डी ते केकतसारणी रस्ता, राममा-५४८ डी ते शेलगाव गंजी रस्ता, राममा-५४८ डी ते उमरी रस्ता, टाकळी ते पाचंबा वस्ती रस्ता आणि बीड तालुक्यातील राममा-५४८ डी ते जैताळवाडी रस्ता अशा एकूण ११ रस्त्यांचा समावेश आहे. मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, बीडच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांचे आ. नमिता मुंदडा यांनी आभार मानले आहेत.                                      

ग्रामीण भागातील रस्ता दुरुस्ती करुन दळणवळणासाठी चांगले दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आ. नमिता मुंदडा यांचे सातत्याने प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे केज मतदारसंघातील जनतेने समाधान व्यक्त केले आहे.
close