shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विडा सर्कल साठी आ.नमिता ताई मुंदडा यांनी तिर्थविकासासह गावोगावी आणली विकासाची गंगा..!!

शिवरामपुरी मठ संस्थानला आ. फंडातुन दहा लक्ष तर तिर्थक्षेत्र विकास निधीतुन चाळीस लक्ष रुपये निधी मंजूर..

प्रकाश मुंडे  / बीड जिल्हा प्रतिनिधी:-

केज तालुक्यातील विडा सर्कल मध्ये केज अंबाजोगाई मतदार संघाच्या भाग्यविधात्या आ. नमिता ताई मुंदडा यांनी तिर्थविकासासाठी तसेच  विडा येथील जाग्रत देवस्थान शिवरामपुरी मठ संस्थान ला आमदार फंडातुन दहा लक्ष तर तिर्थविकास निधी तुन चाळीस लक्ष रुपये एवढा निधी तिर्थविकासासाठी तसेच गावच्या विकासासाठी कोटींचा निधी अथक प्रयत्नातून मंजूर करून विकासाची गंगा आणली त्या बद्दल विडा सर्कल मधील जनतेकडून विशेष आभार मानले जात आहे. 

या विषयी सविस्तर माहिती अशी की,केज-अंबाजोगाई मतदार संघातील मोठी नावाजलेली बाजारपेठ असलेले विडा हे गाव आहे विडा हे सर्कल चे केंद्र बिंदु आहे. त्या च विडा सर्कल मध्ये विधानसभेच्या विद्यमान सदस्या आ. नमिता ताई मुंदडा यांनी तिर्थविकास तिर्थक्षेत्रासाठी गावोगावी मंदीरासाठी सभामंडप, शेत रस्ते, प्रमुख रस्ते,सिमेंट रस्ते यासह अन्य विकास कामांना कोटींचा विकास निधी मंजुर करुन विकासाची गंगा आणली त्या बद्दल आ. नमिता ताईंचे विडा सर्कल मधील जनतेतुन विशेष आभार मानले जात आहे. 

विडा येथील शिवरामपुरी मठसंस्थान ला आमदार फंडातुन दहा लक्ष तर तिर्थविकास निधी तुन चाळीस लक्ष रुपये एवढा निधी मंजुर केला आहे. विडा येथील ग्रामदैवत राजा हनुमान मंदिरासाठी सहा लाख रुपये, मातंग समाज मंदिर पाच लाख रुपये, खंडोबा मंदिर पाच लाख रुपये, मुस्लिम समाजासाठी अत्यावश्यक असणारा शादीखाना या साठी दहा लाख रुपये, कल्याण वाडी पाच लाख रुपये, बुरंडवाडी,लिमनदरा या दोन गावाला स्वातंत्र्य पुर्वी काळापासून रस्ता नव्हता आ. नमिता ताई मुंदडा यांच्या माध्यमातून अथक परिश्रमाने सतत पाठपुरावा करून दोन्ही रस्त्यांना मंजुरी मिळाल्याने दोन्ही गावच्या लोकांची दैना फिटली असल्याने गावातील ग्रामस्थांनी आभार मानले आहे. गौरवाडी दहा लाख रुपये, कोरडेवाडी पाच लाख रुपये,पवार वस्ती मध्ये असणाऱ्या  हनुमान मंदिरासाठी पाच लाख रुपये, आंधळेवाडी आठ लाख रुपये, याच बरोबर देवगाव,दहिफळ येवता,लहुरी,जिवाचीवाडी,घाटेवाडी, शिंदी, सासुरा, वडमाऊली तीर्थक्षेत्र या गावांना पण भरपुर विकास निधी उपलब्ध केला आहे. काही दिवसांतच या मंजुर झालेल्या विकास कामांना सुरुवात होणार असल्याने सर्कल मधील जनतेत समाधान पहायला मिळत आहे.विडा ते पिंपळगाव फाटा, विडा ते कासारी फाटा,विडा ते बरड फाटा, दहिफळ ते बेंगळवाडी मार्गे देवळ्याला जाणारा रस्ता,पिराचीवाडी ते गोपाळ वस्ती ते बुरंडवाडी ला जोडणारा रस्ता अशा अनेक रस्ते आहेत की जेणेकरून मुख्य रस्त्याला जोडले जाणार आहेत.मागील पंधरा वर्षापासुन रखडलेला विकास होता. 

कोट्यावधीचा विकास निधी उपलब्ध करून दिल्याने विडा सर्कल मधील जनतेतुन विशेष आभार मानले जात आहे.
close