भूवरी दिसे सोनेरी साळी,
आनंदी गीते गातो वनमाळी,
नंदीला भरवी गोड पुरणपोळी!!
वर्षाकाठी येई बहीण भोळी,
घास सुखाचा भरून ओवाळी,
रिक्त न राहो वदे मायेची झोळी!! 1!!
लहान थोरांच्या कलेला वाव देई दिवाळी,
घरोदारी साऱ्यांच्या नटे रंगीबेरंगी रांगोळी,
आरासाची चढाओढ संगे वाजे फटाक्यांची गोळी!!2!!
अशी ही सौख्य देणारी दिवाळी,
आनंदी आनंद वातावरण करी दरवेळी,
गड किल्ल्यांची सजावटही मिळे पाहण्यास यावेळी!! 3!!
श्री बाबाजी लक्ष्मण धोत्रे
गणेश नगर दमखाडी
ता़़रोहा जि़़रायगड
8421889240

