shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महास्कूल सेंटरमध्ये विशेष भरती मेळावा संपन्न..!


मेळाव्यात ३८ उमेदवार रोजगारासाठी ठरले पात्र

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहमदनगर, मॉडेल करिअर सेंटर व महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ संचलित महाराष्ट्र पब्लिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने महास्कूल सेंटर सावेडी, परिचय हॉटेलच्या मागे विशेष भरती मेळावा उत्साहात संपन्न झाला.

यावेळी ऑटो क्लस्टर, अहमदनगर चे संचालक विनोद जहागीरदार यांनी अप्रेंटिसशिप व नोकरी मिळविण्याकरिता आवश्यक कौशल्य या विषयी मार्गदर्शन केले. या विशेष भरती मेळाव्यास प्रीमियम इन्शुरन्स ब्रोकर प्रा. ली. मुंबईचे सुनील शिरसाठ व सौ कावेरी गोसावी यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध पदांकरिता मुलाखती घेतल्या आहेत. ६५ उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या असून त्यापैकी ३८ उमेदवार रोजगारासाठी पात्र ठरले.

विशेष भरती मेळावा यशस्वी करण्याकरिता महाराष्ट्र पब्लिक स्कूलचे प्राचार्य अंकुश दराडे, जिल्हा कौशल्य विकास व रोजगार कार्यालयाचे वसीम पठाण, मच्छिंद्र उकीर्डे, कार्यक्रम संयोजक संदीप वाकडे,  प्रणव दराडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी- स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close