shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी सुरु


*जिल्ह्यातील कारागीरांनी अधिकाधिक नोंदणी करुन योजनेचा लाभ घ्यावा

अहमदनगर जि.मा.का. वृत्तसेवा:
हस्त अवजारे वापरुन हाताने काम करणा-या पारंपारिक कारागिर आणि हात कलेच्या कारागीरांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना ओळखपत्र प्राप्त करुन घेणे व त्यांचा विकास करण्यासाठी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेची सुरुवात करण्यात आली असुन जिल्ह्यातील अधिकाधिक कारागीरांनी नोंदणी करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बी.आर. मुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

राष्ट्रीय सुकाणू समितीने अजय आगरकर, जालिंदर वाघचौरे व सचिन पारधी यांचे नामनिर्देशन केलेले आहे. असंघटीत क्षेत्रात स्वयंरोजगार तत्वावर हात अवजारांनी काम करणारा १८ - कुटूंब आधारीत पारंपारिक व्यवसाय करणारा कारागीर या योजनेस पात्र आहे. या योजनेच्या लाभाकरीता सीएससी केंद्रात जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे. कारागीर ओळखपत्र प्राप्त झाल्यानंतर योजनेचा लाभ मिळण्यास सुरवात होईल. योजनेच्या लाभामध्ये प्रथमतः ५ ते ७ दिवसांचे मुलभूत प्रशिक्षण या कालावधीमध्ये दररोज ५००  रुपये विदयावेतन व टुलकिट करीता १५ हजार रुपये देण्यात येतील. त्यानंतर एक लक्ष रुपयांचे कर्ज विनातारण १८ महिन्यांकरीता ५ टक्के व्याज दराने अर्थ सहाय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. प्रथम घेतलेल्या कर्जाची पूर्णतः परतफेड केल्यानंतर नव्याने 2 लक्ष रुपये तीस महिन्यांकरीता अर्थसहाय उपलबध करुन देण्यात येणार आहे.
या योजनेत जिल्ह्यातील सर्व कारागीरांना जास्तीत जास्त नोंदणी करुन सदर योजनेचा लाभ घ्यावा. तसेच, प्रशिक्षणाकरीता प्रशिक्षकाची मानधनावर नियुक्ती करावयाची असून १८ व्यवसायातील दिर्घ अनुभवी इच्छुक प्रशिक्षकांनी https://forms.gle/AdGmPJD8AmVvxtaG7 या लिंकवर आपली माहिती भरावी अथवा बायोडाटा ahmadnagarrojgar01@gmail.com ई-मेल पाठवावा, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close