कानडे - ससाणे गटाकडे ७ सदस्य व सरपंच तर विरोधी मुरकूटे - ससाणे गटाकडे ८ सदस्य
चंद्रकांत झुरंगे - भोकर
श्रीरामपूर तालुक्यातील तालुक्यातील भोकर ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची उद्या दि.२३ नोव्हेंबर २०२३ रोजी लोकनियुक्त सरपंच सौ.शितल प्रताप पटारे यांचे अध्यक्षतेखाली होत आहे. येथे नुकत्याच झालेल्या सरपंच व सदस्य मंडळाच्या चुरशीच्या निवडणुकीत नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे या निवडीला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. येथे माजी आमदार भानुदास मुरकूटे व करण ससाणे गटाचे आठ सदस्य विजयी झालेले आहेत तर आमदार लहु कानडे व करण ससाणे गटाचे सात सदस्य निवडून आलेले असल्याने काठावरच्या बहुमतात कोण बाजू मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
भोकर ग्रामपंचयातीत नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मुरकूटे ससाणे गटाच्या जगदंबा लोकसेवा विकास आघाडी विरूद्ध कानडे - ससाणे गटाच्या जगदंबा परीवर्तन मंडळाने परीवर्तन घडवत बाजी मारलेली आहे. येथे कानडे - ससाणे गटाच्या सौ. शितल प्रताप पटारे या विजयी झालेल्या आहेत. येथे असलेल्या १५ सदस्य संख्येत या लढतीत मुरकूटे - ससाणे गटाचे ८ सदस्य विजयी झालेले आहेत तर कानडे - ससाणे गटाचे ७ सदस्य विजयी झालेले आहे.
त्यात मुरकूटे - ससाणे गटाचे माया तान्हाजी राक्षे, हिराबाई मच्छींद्र खंडागळे, सिमा सुनिल विधाटे, गिरीष नारायण मते, संजीवनी ज्ञानेश्वर काळे, मिना राजेंद्र आबुज, विजय पावलस अमोलीक व काळू संजय गायकवाड असे ८ सदस्य आहेत तर कानडे - ससाणे गटाचे मयुर दत्तात्रय काळे, आप्पासाहेब दत्तात्रय जाधव, संगीता बाळासाहेब अभंग, सागर दत्तात्रय आहेर, संदिप बापूसाहेब गांधले, छाया दत्तात्रय आहेर, ज्योती वेणुनाथ डूकरे असे ७ सदस्य व लोकनियुक्त सरपंच असे पक्षीय बलाबल आहे.
एकंदरीत येथील बहुमत काठावरचे असल्याने निवडणुकीच्या निकाला नंतरच्या राजकीय खेळीत व उमेदवार फोडाफोडीच्या राजकारणात ज्याची सरशी होईल त्याचा उपसरपंच होणार असे प्राथमिक चित्र असले तरी दोन्ही गटाचे सदस्य सहलीला गेले आहेत. उद्या सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ उपसरपंच पदाचे उमेदवार, सुचक व अनुमोदक हेच येवून उमेदवारी दाखल करणार व त्यानंतर दुपारी दोन वाजता परीस्थीतीनुसार बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी सर्वच सदस्य उपस्थीत राहणार आहेत. दोघांनी ही आपले सदस्यांच्या संपर्कात राहुन सहलीला जाईपर्यत सदस्य फुटणार नाही याची काळजी घेत अनेक प्रकारचे अमिष दाखवत विरोधातील सदस्य आपलेसे करण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू असल्याची चर्चा जोरात आहे.
दरम्यान येथे कानडे ससाणे गटाने उपसरपंच पदाच्या उमेदवाराचे नाव घोषीत केलेले नसले तरी सर्व सदस्यांच्या सहमती नंतर उद्या सकाळी निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी सदस्यात एकमत न झाल्यास ऐनवेळी ईश्वरी चिठ्ठीने उपसरपंच निश्चीत होणार असले तरी सध्या तरी आप्पासाहेब जाधव व संगीता अभंग याची नावे चर्चेत आहेत तर मुरकूटे ससाणे गटाने ही नाव जाहीर होवू दिले नसले तरी प्रभाग तीन मधून विजयी झालेल्या संजीवनी काळे व गिरीष मते यांची नावे सध्या चर्चेत आहेत. काठावरच्या बहुमतात आज कानडे - ससाणे गटाकडे सरपंचपद असल्याने प्रथम दर्शनी दोनही गटाकडे आज सारखेच बलाबल असले तरी काठावरच्या बहुमतात उद्या कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
येथे उद्या सकाळी १० ते १२ या वेळेत उपसरपंच पदाचे नामनिर्देशन दाखल होत आहे. दुपारी १२ ते १ या वेळेत छाननी, दुपारी १ ते २ ही वेळ उमेदवारी मागे घेण्यासाठी निर्धारीत करण्यात आली आहे, तर दुपारी २ वाजता उपसरपंच निवड होत आहे. या बैठकीचे अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ.शितल पटारे या असणार आहेत तर निवडणुक निरीक्षण अधिकारी म्हणून श्रीरामपूर उपविभागाचे म.जी.पा. चे शाखा अभियंता काम पाहत आहेत.
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

