shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री मा. बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते श्रीरामपूरात महिला भगिनींचा सन्मान


प्रत्येक क्षेत्रात महिलांनी धैर्याने पुढे यावे- सौ. ससाणे

श्रीरामपूर प्रतिनिधी:
प्रत्येक क्षेत्रात महिला भगिनींनी धैर्याने पुढे येऊन आपली योग्यता सिद्ध केली पाहिजे असे प्रतिपादन श्री शक्ती ग्रुपच्या संस्थापिका,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव सौ.दिपालीताई ससाणे यांनी केले आहे.

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींना सौ दिपालीताई ससाणे यांच्या वतीने " प्रियदर्शिनी इंदिरा " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सौ ससाणे बोलत होत्या. यामध्ये प्रामुख्याने सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांमध्ये सौ. नीता डंबिर, सौ. आशाताई परदेशी व सौ. सुजाता शेडगे यांना तर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांमध्ये डॉ.सुचिता भट्टड व डॉ. वैशाली कापसे यांना तसेच व्यावसायिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांमध्ये सौ. ज्योती खजिनकर, सौ. साधना चुडीवाल, सौ. विनिता शिरसाठ, प्राची फरगडे व शकुंतला शिंदे यांना माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत "प्रियदर्शिनी इंदिरा" पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाने इंदिरा फेलो म्हणून निवड झालेल्या सौ.शोभाताई भारसाकळ व सौ. संगीता ठोंबरे यांचाही याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यावेळी श्री शक्ती ग्रुप च्या अध्यक्षा माधुरी सोनवणे, उपाध्यक्षा पूजा मुंदडा, शक्ती सुपर सी च्या समन्वयक भारती रासकर, श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस, शहर काँग्रेस, युवक काँग्रेसचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पत्रकार राजू मिर्झा
संकलन
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111
close