shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निवडणुकीच्या काळात विरोधकांनी मतदारांची दिशाभूल केली - नानासाहेब आसने


*बी.आर.चेडे - शिरसगांव
श्रीरामपूर तालुक्यातील माळवाडगांव ग्रामपंचायत निवडणुकीच्या दरम्यान विरोधकांनी मतदारांची दिशाभूल केली असल्याची टीका नूतन ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आसने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.


        माळवाडगाव ग्रामपंचायतीची पंच वार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली आहे. या निवडणुकीदरम्यान विरोधकांनी ग्रामपंचायतीच्या जुन्या पाणीपुरवठा विहिरीजवळ असलेल्या गावतळ्यात पाणी सोडण्यात येणार नाही सदरचे पाणी हे ग्रामपंचायतीने नवीन योजना आणलेल्या भालेराव टेलटॅंक या ठिकाणी जाणार असल्याची चुकीची अफवा गावात पसरवून मतदारांची दिशाभूल करत मते मिळवले आहे मात्र सदर नवीन पाणीपुरवठा योजनेचा आणि पाटपाण्याचा काही संबंध नसून नूतन पाणीपुरवठा विहिरीजवळील टेलटॅंक हा इरिगेशनच्या स्वमालकीचा आहे आणि जुन्या पाणीपुरवठा विहिरीजवळील गावतळे हे अ वर्गाचे आहे त्यामुळे ग्रामपंचायतीने मागणी केल्यास त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्यात येते आणि याबाबत आम्ही पाठपुरावा करून सदर गाव तळे भरून घेतले आहे त्यामुळे विरोधकांनी जी चुकीची अफवा गावात पसरवली होती ती निंदनीय होती असे यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आसने यांनी म्हटले आहे.

माळवाडगांव ग्रामपंचायतीचे गावाला पाणी पुरवठा करणारे गावतळे भरल्यानंतर त्याची पाहणी करताना ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब आसने, रावसाहेब काळे,योगेश आसने, काकासाहेब आसने,अंकुश आसने,अनिल आसने,सचिन आसने,प्रदीप आसने,सतीश आसने,महेश आसने, मच्छिंद्र गाढे व समवेत ग्रामस्थ.

- संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close